नेटकऱ्यांचे करिनाला टोमणे म्हणतायेत...

बॉलिवूड सेलेब्सनीही त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काम करायला सुरूवात केली आहे. 

Updated: Sep 6, 2021, 03:13 PM IST
नेटकऱ्यांचे करिनाला टोमणे म्हणतायेत... title=

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती सामान्य होत आहे. प्रत्येकजण आपापल्या कामाकडे पुन्हा परतत आहे. बॉलिवूड सेलेब्सनीही त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काम करायला सुरूवात केली आहे. सेलेब्ससाठीही त्यांचं आयुष्य आता पुर्वीसारखं सामान्य होऊ लागलं आहे. प्रत्येक सेलिब्रिटी आता पार्टी आणि कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. सेलेब्स घराबाहेर, रेस्टॉरंट्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि एअरपोर्टच्या बाहेर स्पॉट होतात. 

अलीकडेच करीना कपूर खान देखील स्पॉट झाली. यादरम्यान ती कॅज्युअल लूकमध्ये दिसली आहे. करीना कपूर खानच्या या फोटोत कोणताही मेकअप लुक दिसत नाही. हे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. हा फोटो पाहून चाहते म्हणाले की, करीनाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या स्पष्ट दिसत आहेत. तिच्या चेहऱ्यावरील सूज देखील स्पष्ट दिसून येत आहे. तिच्या चेहऱ्याचा कट खूप वेगळा दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

या फोटोमध्ये करीना कपूर खान ब्लू डेनिम आणि प्रिंटेड शर्टमध्ये दिसत आहे. मोकळ केस आणि तिने गॉगल देखील घातला आहे. एका युजरने लिहिलं की, "करीनाच्या चेहऱ्याला काय झालं आहे, ती म्हातारी दिसू लागली आहे." तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "करीनाचा चेहरा इतका विचित्र का दिसत आहे?" एका  युजरने लिहिलं की, "मायकल जॅक्सन दिसत आहे." इतर अनेक युजर्सनी हे फोटो पाहिल्यानंतर धक्कादायक इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.