सैफला सोडून 'या' व्यक्तिसोबत फिरतेय करिना, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते

Updated: Jul 24, 2021, 04:29 PM IST
सैफला सोडून 'या' व्यक्तिसोबत फिरतेय करिना, फोटो व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने आपला दुसरा मुलगा जेह अली खानच्या प्रसूतीनंतर पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही ती खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते. सोशल मीडियावरही तिचे बरीच फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

नुकतंच करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कामा दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिची मोठी बहिण करिश्मा कपूर आणि चित्रपट निर्माते पुनीत मल्होत्रा ​​देखील आहेत. हे फोटो शेअर करत तिनं या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, 'सर तुम्ही खूप चांगले आहात' या फोटोत करीना कपूरने ऑरेंज रंगाचं ऑफ शोल्डर टॉप आणि ब्लॅक फेयर पँट परिधान केली आहे.

तिने तिची हेअरस्टाईल पोनीटेलमध्ये बांधली आहे. आता आम्ही तुम्हाला करीना कपूरच्या या ऑफ शोल्डर टॉपची किंमत सांगणार आहोत. जी तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. जर तुम्हाला देखील हा टॉप घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला भारी किंमत मोजावी लागणार आहे.

करीना कपूर खानचा ऑफ-शोल्डर टॉप जोनाथन सिमखाईच्या झायला ब्रँडचा आहे. याची मूळ किंमत 510 डॉलर म्हणजेच 38 हजार 639 रुपये ईतकी आहे. पण आता त्यावर 20 टक्के सूट मिळत आहे. सूट मिळाल्यानंतर हा टॉप 419 डॉलरला म्हणजेच भारतीय शुल्कानुसार 30 हजार 896 रुपये ईतक्या किंमतीत मिळत आहे. करीना कपूर खान अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी परफेक्ट लूकसाठी कितीही रक्कम खर्च करते.