बेबो दुसऱ्या प्रेग्नेसीनंतरही फिट; 20 किलो घटवलं वजन

दुसऱ्यांदा आई होवूनही करीना पुन्हा झाली एवढी स्लीम, यानंतर आता शुटिंगलाही  केली सुरूवात      

Updated: Mar 23, 2021, 11:06 AM IST
बेबो दुसऱ्या प्रेग्नेसीनंतरही फिट; 20 किलो घटवलं वजन title=

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान सध्या जोरदार चर्चेत आहे. तिने नुकताच तिच्या आणि अभिनेता सैफ अली खानच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू असतानाच करीनाच्या पुन्हा कामावर हजर होण्याच्या चर्चांनी जोर धराला आहे. करीना पुन्हा कामावर परतण्याच्या पुर्ण तयारीत आहे. आता देखील करीनाने मोठा ब्रेक घेतला नाही. करीनाने दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शूटिंगच्या सेटवरील काही फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये करीना पूर्णपणे फिट दिसत आहे. करीनाने दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर 20 किलो वजन कमी केलं आहे.  21 फेब्रुवारी रोजी तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. यानंतर करीना 1 महिन्यानंतर कामावर परतली आहे. शुटिंगच्या सेटवरील करीनाचा नवा लूक चाहत्यांना फार आवडला आहे.

फोटोमध्ये करीना लाईट ब्यू रंगाच्या ट्रेसमध्ये फारचं सुंदर दिसत आहे. लाईट निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये  तिने क्रिम रंगाची सॅन्डल घातली आहे. दरम्यान,करीनाने  २1 फेब्रुवारी 2021 रोजी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर 8 मार्च म्हणजे महिला दिनां औचित्य साधत तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.