...म्हणून करीनाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरचा फोटो

काही आठवणी मात्र कायम ह्रदयाच्या एका कोपऱ्यामध्ये वसलेल्या असतात.   

Updated: Oct 27, 2020, 08:56 AM IST
...म्हणून करीनाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरचा फोटो

मुंबई : बॉलिवूड विश्वात अनेक नाती जुळून येतात आणि तुटतात देखील. पण त्या नात्यातील काही आठवणी मात्र कायम ह्रदयाच्या एका कोपऱ्यामध्ये वसलेल्या असतात. त्या आठवणी विसरणं अशक्य असतं. असचं काहीस अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरसोबत देखील झालं आहे. काही वर्षांपूर्वी रियल लाईफमधल्या या जोडीने सर्वांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. पण आजही शाहिद-करीनाच्या नात्याची चर्चा होते. 

आताच्या घडीला हे दोघेही त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण करीनाने जुन्या आठवणींना उजाळा देत शाहिद कपूरसोबत एक फोटो शेअर केला आहे. 'जब व्ही मेट' या चित्रपटातील हा फोटो आहे. चाहत्यांनी चित्रपटातील करीना आणि शाहिदच्या जोडीला चांगलेचं डोक्यावर घेतले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

'Mujhe toh lagta hai life mein jo kuch insaan real mein chahta hai, actual mein, usse wohi milta hai'  #13YearsOfJabWeMet @imtiazaliofficial @shahidkapoor #ShreeAshtavinayakCineVision

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

२००७ साली प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या चित्रपटाला  चित्रपट प्रदर्शित होऊन १३ वर्षे झाली आहेत. फोटोमध्ये करीना, इम्तियाज अली आणि शाहिद कपूर दिसत आहेत. करीनाने फोटो शेअर करत सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. 

ती म्हणते, 'जीवनात जी गोष्ट माणसाला खरचं हवी असते, ती गोष्ट त्याला नक्की मिळते.' असं कॅप्शन तिने या फोटोला दिले. सध्या शाहिद आणि करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय चित्रपटाचा दुसरा भाग लवकरात लवकर यावा अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत.