नववर्षाच्या 'वोग'साठी करिनाचे फोटोशूट...

करिना कपूर खान हीने आपल्या कामातून स्वतःला सिद्ध केले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 29, 2017, 12:57 PM IST
नववर्षाच्या 'वोग'साठी करिनाचे फोटोशूट... title=

नवी दिल्ली : करिना कपूर खान हीने आपल्या कामातून स्वतःला सिद्ध केले आहे. नवोदित कलाकारांसाठी आणि काम करणाऱ्या मातांसाठी ती प्रेरणा ठरत आहे.

फिटनेस आणि सौंदर्य लक्षवेधी 

ती इतकी अपडेट आणि अॅक्टीव्ह असते की ती ब्रेकवर असल्यासारखे वाटतच नाही. तिची प्रेग्नंसी तिने अत्यंत ग्रेसफुली हाताळली. त्यानंतर वाढलेले वजन चुटकीसरशी कमी करून पुन्हा ती पुर्ववत झाली. तिचा हा फिटनेस आणि सौंदर्य खरंच लक्षवेधी ठरत आहे. 

इंस्टाग्रामवर शेअर 

अलिकडेच बेबोने वोग इंडियाच्या जानेवारीच्या अंकासाठी खास फोटोशूट केले. ते फोटोज वोगने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

'विरे दी वेडींग'

काही दिवसांपुर्वीच तिने 'विरे दी वेडींग' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. सध्या ती पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत स्विझर्लंड्मध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.