हनिमूनला पतीने करिष्मा कपूरला मित्राच्या रूममध्ये झोपण्यास सांगितलं, धक्कादायक कहाणी

लग्नानंतर करिश्माच्या आयुष्यात खूप काही बदलंल

Updated: Apr 17, 2021, 05:14 PM IST
हनिमूनला पतीने करिष्मा कपूरला मित्राच्या रूममध्ये झोपण्यास सांगितलं, धक्कादायक कहाणी

मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूरला दोनवेळा धोका मिळाला. यानंतर तिने संजय कपूरसोबत लग्न केलं होते. संजयचे आधी देखील लग्न झाले होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन त्याने करिश्मासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर करिश्मा संजयसोबत दिल्लीमध्ये रहायला लागली होती. या लग्नानंतर तिच्या आयुष्यात खूप काही बदलंल.  लग्नानंतर दररोज होणाऱ्या भांडणांना करिश्मा कंटाळली आणि 2016 साली हे लग्न तुटलं. 

दोघांचे लग्न केवळ 13 वर्ष चालले. 2012 मध्ये करिश्माने पतीपासून वेगळे राहण्यास सुरुवात केली. संजय कपूर  (Sanjay Kapoor) ने करिश्माला खूप त्रास दिला. हनीमूनच्या दिवशी स्वत:च्या बायकोची बोली लावणं ही त्यातली सर्वात वाईट आठवण आहे. एका मुलाखती दरम्यान करिश्माने आपल्यासोबत घडलेला किळसवाणा प्रकार सांगितला. पतीसोबत हनीमुनला गेली तेव्हापासून करिश्मासोबत टॉर्चर व्हायला सुरुवात झाली होती. 

हनीमुनच्या रात्री पतीने मला मित्रासोबत जबरदस्ती झोपायला भाग पाडल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला. जेव्हा असं करण्यास नकार दिला तेव्हा त्याने मारहाण केल्याचे करिश्मा म्हणाली. संजयने आपल्या मित्राला आपली किंमत देखील सांगितल्याचे ती पुढे म्हणाली. संजयचं नव्हे तर त्याची आई देखील मारहाण करायची असा खुलासा करिश्माने केला.

लग्नानंतर ती कौटुंबिक हिंसाचाराची बळी पडली होती. करिश्मासोबत लग्नानंतरही संजय आधीच्या पत्नीसोबत लिव्हइन रिलेशनमध्ये रहायचा.  करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी संजय कपूरला थर्ड क्लास माणूस म्हटले होते. तो केवळ नशा आणि अय्याशीमध्ये बुडालाय असे ते म्हणाले होते. संजय कपूर  (Sanjay Kapoor) घटस्फोटानंतर करिश्मा आपल्या मुलांना स्वत: संभाळते. 

आपल्या दोन मुलांची ती पूर्ण काळजी घेते. मुलांसाठी करिश्मा आणि संजय आपापसातले मतभेद विसरुन नात्यातला कडवडपणा विसरले आहेत.  करिश्मा (Karisma Kapoor) आपली मुलं आणि पती संजय कपूर याच्यासोबत दिसली होती. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजयने (Sanjay Kapoor) तिसरे लग्न केले. प्रिया सचदेव त्याची तिसरी पत्नी आहे.