रणबीर - आलियाच्या लग्नानंतर करिश्मा कपूरकडे 'गुडन्यूज'

कपूर कुटुंबात आनंदचं आनंद... करिश्मा पुन्हा करणार 'नवी सुरुवात....', चर्चेला उधाण 

Updated: Apr 19, 2022, 09:46 AM IST
रणबीर - आलियाच्या लग्नानंतर करिश्मा कपूरकडे 'गुडन्यूज' title=

मुंबई :  अभिनेत्री करिश्मा कपूर नुकताचं अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नामुळे चर्चेत आली. लग्नात आलिया भट्टचा कलीरा करिश्मा कपूरवर पडला, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यामुळे करिश्मा खरंच लग्न करणार का? तिच्याकडे नक्की कोणती 'गुडन्यूज' आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते...

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. अनेक वर्षांनंतर करिश्माने पुन्हा आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला आहे. करिश्मा लवकरचं  'Delhi Belly' फेम दिग्दर्शक अभिनय देव यांच्या 'ब्राउन' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

नुकताचं करिश्मा इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत आगामी सिनेमाविषयी माहिती दिली आहे. सध्या तिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर तिने कॅप्शनमध्ये 'नवी सुरूवात...' असं देखील लिहील आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करिश्माच्या सिनेमांविषयी सांगायचं झालं तर,  'अंदाज अपना-अपना', 'राजा हिंदुस्‍तानी', आणि 'दिल तो पागल है' या सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. तिच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 

याशिवाय अभिनेता गोविंदासोबतची तिची जबरदस्त जोडी आणि दोघांचे कॉमिक टायमिंगही प्रेक्षकांनी प्रचंड आवडलं. 47 वर्षीय करिश्मा कपूरने 1991 मध्‍ये 'प्रेम कैदी' सिनेमातून करिअरची सुरुवात केली. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम डान्सर म्हणूनही लोकप्रिय होती.