एक दोन नव्हे तर तब्बल 37 वेळा कार्तिक आर्यनकडून अभिनेत्रीला Kiss

'प्यार का पंचनामा'मध्ये आपल्या मोनोलॉगमुळे हिट झालेला कार्तिक आर्यनला आज कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही.  

Updated: Dec 30, 2021, 05:15 PM IST
एक दोन नव्हे तर तब्बल 37 वेळा कार्तिक आर्यनकडून अभिनेत्रीला Kiss title=

मुंबई : 'प्यार का पंचनामा'मध्ये आपल्या मोनोलॉगमुळे हिट झालेला कार्तिक आर्यनला आज कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही.  त्याने बॉलिवूडमध्ये कॉमेडी ते रोमँन्टिक सिनेमापासून आपली चॉकलेट हिरोपर्यंत ईमेज कायम ठेवली आहे. मात्र आता फिल्ममध्ये रोमँन्टिक सीन्स देणाऱ्या कार्तिकला सिनेमात किसींग सीन देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती.

३२ वेळा केलेल्या किसची का होतेय आता चर्चा
हा किस्सा 'कांची' सिनेमा दरम्यानचा आहे. त्यावेळी कार्तिक आर्यनने कॉलेजच्या थर्ड ईअरमध्येच सिनेमा साईन केला होता. त्याला 'प्यार का पंचनामा' या सिनेमाची ऑफरही मिळाली होती. या सिनेमानंतर  'कांची'मध्ये कार्तिकला सपोर्टिंग रोल मिळाला होता. सुभाष घई या सिनेमाचे दिग्दर्शक होते. 

या सिनेमासाठी कार्तिकला सिनेमाच्या लीड एक्ट्रेसला किसींग सीन द्यायचा होता. मात्र कार्तिकसाठी हे सोपं नव्हतं. त्याला किसच करता येत नव्हतं. आणि यासाठी त्याने एक दोन नव्हे तर तब्बल ३७ रिटेक्स त्याला द्यावे लागले होते. एका मुलाखतीमध्ये कार्तिकने या बद्दलचा खुलासा केला होता. कार्तिकची ही जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

एका मुलाखती दरम्यान कार्तिक आर्यन याबद्दल बोलताना म्हणाला होता की, ''सुभाष यांना पॅशिनेट किस हवं होतं. आणि मला जरा सुद्धा किस करता येत नव्हतं. तेव्हा मी त्यांना विचारणार होतो की, प्लिज सर हे कसं करतात हे करुन दाखवा प्लिज'' मी कधी विचारही केला नव्हता की, किसींग सीन एवढी मोठी डोकेदुखी असेल. आम्ही त्या दिवशी लवर्ससारखे वागत राहिलो. शेवटी सुभाष सर खूश झाले. जसा सीन त्यांना हवा होता तसा त्यांना मिळाला.