वयाच्या 50 व्या वर्षी कश्मीरा शाहकडून 'तो' हॉट व्हिडिओ शेअर

कश्मीरा शाहने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Dec 7, 2021, 01:57 PM IST
वयाच्या 50 व्या वर्षी कश्मीरा शाहकडून 'तो' हॉट व्हिडिओ शेअर title=

मुंबई : कॉमेडिअन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह क्वचितच रुपेरी पडद्यावर दिसली आहे. मात्र तिच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्यात कधीही अपयशी ठरत नाही. कश्मीरा शाहने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडाली आहे. व्हिडिओतील कश्मिरा शाहचं सौंदर्य पाहून चाहत्यांचे देखील आश्चर्यचकित होत आहेत. 

स्पोर्ट्स ब्रा मध्ये किलर पोज
या फोटोमध्ये कश्मीराने स्पोर्ट्स ब्रा घातली असून ती पूलच्या बाजूला बसली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती सुरुवातीला थोडी नरवस दिसतेय. पण नंतर ती कॅमेराकडे पाहून हसू लागते. आणि फोटोसाठी  ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.  

व्हिडिओमध्ये 'चकाचक' हे गाणं ऐकायला मिळत आहे. कश्मीरा शाहचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. यूजर्स कमेंट करून कश्मिराचे कौतुक देखील करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांनी बांधले कौतुकाचे पूल 
कश्मीरा शाहच्या या व्हिडिओवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलंय की, 'खूप सुंदर तर दुसर्‍याने कमेंट करत, तू खूप हॉट आहेस असं म्हटलं आहे. तर अजून एकाने लिहिलंय की, तू सेक्सी दिसत आहेस. अशाप्रकारे चाहते कश्मिराचं कौतुक करताना दिसत आहेत. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.