हॉलिवूडच्या लोकप्रिय Actress नं Film Industry ची केली पोल-खोल; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीं केलं सपोर्ट

या हॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर Kareena आणि Anushka तिच्या सपोर्टमध्ये पुढे आल्या आहेत. 

Updated: Dec 16, 2022, 06:16 PM IST
हॉलिवूडच्या लोकप्रिय Actress नं  Film Industry ची केली पोल-खोल; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीं केलं सपोर्ट title=

Kareena Kapoor and Anushka Sharma Root For Kate Winslet Over Exposing Film Industry : चित्रपटाला सुपरहीट करण्यासाठी कलाकारांना स्क्रिप्टची गरज पूर्ण करावीचं लागते. इतकंच काय तर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी करावी म्हणून निर्माते लोकप्रिय कलाकरांना कास्ट करतात. एवढंच काय तर तरुण अभिनेत्रींकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. एकदा काय अभिनेत्रींचं वय वाढले की कोणी त्यांना चांगल्या भूमिका ऑफर करत नाही, असे काही लोक बोलताना आपण ऐकलं आहे. केट ही हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती विशेषत: पीरियड ड्रामा आणि चित्रपटांमधील हेडस्ट्राँग आणि क्लिष्ट महिलांची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. दरम्यान, 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way of Water) चित्रपटातील अभिनेत्री केट विन्सलेट (Kate Winslet) नं या संबंधीत वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली असून बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) तिला पाठिंबा दिला आहे. 

जेम्स कॅमेरॉनचा बहुप्रतिक्षित

पीपल मॅगझिननं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केट विन्सलेटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत केट बोलते की, 'माझ्याकडे काही उत्तम आदर्श आहेत, परंतु मला असं वाटत नाही की लोक सतत कोणतीही चांगली संधी असली की माझा विचार करत असतील. आता आपण सतत तरुण कलाकारांच्या शोधात आहोत. तर यापैकी काही तुम्हाला माहित आहे, तुम्ही काय करणार आहात हे पाहण्यासाठी, तुम्ही इथे काय करत आहात, तुमच्या पेक्षा कोणी चांगली व्यक्ती इथे असेल, सगळं विसरा. तुम्हाला पाहण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक असतात. (Kate Winslet Exposes Film Industry Anushka Sharma and Kareena Kapoor Khan Root For Her) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते; S#* कॉमेडी चित्रपट करण्यावर Riteish Deshmukh च मोठ वक्तव्य

पुढे केट म्हणाली, तुम्ही चूक केली तरी त्यात काही फरक पडत नाही, कारण तुम्ही तुमच्या चुकीतून शिकता. त्यामुळे अनुभव असलेल्या कलाकारांपैकी एक असल्यानं मला आलेले अनुभव सगळी माहिती मी इतरांसोबत शेअर करायला तयार आहे. मी त्या क्षणाचे खरोखर विचार करत आहे कारण मला असं वाटतं की मी त्या स्टेजला जाण्याचा अधिकार मिळवला आहे. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी हे थांबवेन असं हवं आहे. केटचा हा व्हिडीओ शेअर करत करीना कपूर म्हणाला, 'केट तू बेस्ट आहेस.' तर अनुष्का शर्मा म्हणाली, 'तिनं करून दाखवलं.'