SRK Promote Pathaan In FIFA World Cup 2022: सध्या बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान (Shah Rukh Khan), अभिनेता जॉन अब्राहम (john abraham) आणि अभिनेत्री दीपिका पादूकोन (Deepika Padukone) यांच्या पठाण चित्रपटाची (Pathaan) जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मात्र, चित्रपट सध्या वादात अडकलाय. कारण ठरली चित्रपटात दाखवण्यात आलेली दीपिकाची भगव्या रंगाची बिकनी...(Pathan Controversy) मात्र, आता वादावर पडदा टाकण्यासाठी किंग खानने नवी योजना आणखी आली. सध्या सुरू असलेल्या FIFA World Cup 2022 फायनलमध्ये 'किंग खान'चा (Shah Rukh Khan) जलवा पहायला मिळणार आहे.
सोशल मीडियावर ट्रोलर्स शाहरूखच्या 'बेशरम रंग' हे गाणं (Besharam Rang Song) ट्रोल होताना दिसत आहे. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी (Deepika's saffron bikini) घातल्याने काहींनी यावर आक्षेप घेतलाय. तर काही संघटनांनी याचा धर्माशी संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणावर चित्रपटावर बंदी (Ban Pathaan) घालावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच आता कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये बोलत असताना शाहरूख खानने सर्वांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर आता फिफामध्ये शाहरूख खान पठाण चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे. (shah rukh khan to promote pathan during football world cup finale 2022 Argentina Vs France Match marathi news)
शाहरूख खानने त्याच्या इन्टाग्राम पोस्टमध्ये (Shah Rukh Khan Instragram) मोठी घोषणा केली. प्री-मॅच कव्हरेज दरम्यान, ब्रॉडकास्टरने 'पठाण' ची क्लिप देखील शेअर केली आणि 18 डिसेंबर रोजी म्हणजेच फिफा विश्वचषक फायनलच्या (Argentina Vs France final Match) दिवशी शाहरूख स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार असल्याचंही जाहीर केलंय. मैदानात मेस्सी (Messi) आणि म्बाप्पे (mbappe)... तर स्टूडियोमध्ये समालोचक वेन रुनी (wayne rooney) आणि मी, असं शाहरूख या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
आणखी वाचा - Shah Rukh Khan ला 'अशा' अवस्थेत पाहून का भडकले चाहते? Photo Viral
दरम्यान, शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा पठाण 25 जानेवारी 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित (pathan release date) होणार आहे. सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता रंगाचा बेरंग वाद शमणार की आणखी वाढणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.