कठुआ गँगरेप प्रकरण : या कलाकारांनी राग केला व्यक्त

 जम्मू काश्मिरच्या कठुआ येथे 8 वर्षाच्या मुलीवर झालेल्या गँगरेप प्रकरणाचे पडसाद भारतभर पडत आहे. 

कठुआ गँगरेप प्रकरण : या कलाकारांनी राग केला व्यक्त  title=

मुंबई : जम्मू काश्मिरच्या कठुआ येथे 8 वर्षाच्या मुलीवर झालेल्या गँगरेप प्रकरणाचे पडसाद भारतभर पडत आहे. या प्रकरणावर क्रिडा आणि बॉलिवूड जगतातील अनेक कलाकारांनी आपला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. यामध्ये रितेश देशमुख, रेणुका शहाणे, सानिया मिर्जा, अभिषेक बच्चन, फरहान खान यांनी ट्विट करून घटनेबाबत निषेध व्यक्त केला असून न्यायाची मागणी केली आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचे असे म्हणणे आहे की, दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल. काही लोकांच्या समूहाने कायद्याचा भंग केला आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल तसेच या प्रकरणावर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. 

या प्रकरणात कलाकारांनी आपला राग ट्विटरच्या माध्यमातून केला व्यक्त 

फरहान अख्तर

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर लिहितो की, 8 वर्षाच्या त्या चिमुकलीच्या डोक्यात त्यावेळी काय सुरू असेल. त्या मुलीला नशेची औषध देऊन बांधून ठेवलं आणि इतके दिवस पाशवी अत्याचार करून तिची हत्या केली. या प्रकरणातील तिच्या मनाची अवस्था आणि भीति अनुभवू शकत नसाल तर तुम्ही माणून देखील नाहीत असं फरहान म्हणाला. 

सानिया मिर्झा

या प्रकरणात सानिया मिर्झाने देखील ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. सानिया असं म्हणते की, या देशाच्या माध्यमातून आपण विश्वात एक ओळख निर्माण करू इच्छितो? आज आपण जात, लिंग, रंग आणि धर्माच्या पलिकडे जाऊन 8 वर्षाच्या मुलीसाठी उभे राहू शकत नाही तर आपण कोणत्याच गोष्टी विरोधात उभे राहू शकत नाही. 

रितेश देशमुख 

रितेश देशमुख काठुआ आणि उन्नाव प्रकरणावर ट्विट केलं आहे.एका बाजूला 8 वर्षाच्या मुलीला नशेची औषध देऊन बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे आपल्या मुलीवर बलात्कार झालेल्या वडिलांची देखील पोलीस ठाण्यात निर्घुण हत्या झाली. या दोन्ही प्रकरणावर आपण आवाज उठवला पाहिजे अन्यथा मूकदर्शक बनलं पाहिजे. अयोग्य गोष्टीच्या विरोधात उभे राहा मग तुम्ही एकटे का असेना?

रेणुका शहाणे 

कलाकारांप्रमाणे नेटीझन्सनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. जात, धर्म, पंत यासगळ्याच्या पलिकडे जाणून आपण काठुआ आणि उन्नाव प्रकरणात एकत्र येऊन महिलांच्या सुरक्षिततेसाठी एकत्र आलं पाहिजे. या प्रकरणाबाबत कठोर चौकशीची आणि योग्य न्यायाची मागणी केली पाहिजे.