Katrina Kaif आणि Vijay Sethupati करणार स्क्रिन शेअर, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

Katrina Kaif नं सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत ही बातमी दिली आहे. लवकरच तिचा आणि विजय सेतुपतीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Dec 24, 2022, 05:01 PM IST
Katrina Kaif आणि Vijay Sethupati करणार स्क्रिन शेअर, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित  title=

Katrina Kaif and Vijay Sethupati In Merry Christmas Movie : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता 2022 हे वर्ष संपत असताना कतरिनानं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कतरिनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गूड न्युज दिली आहे. 

कतरिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचं नाव 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) असे आहे. या चित्रपटात कतरीना विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटातून कतरिना दाक्षिणात्य चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. या दोघांचा हा पहिलाच एकत्र चित्रपट असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. हे पोस्टर शेअर करत हा चित्रपट आम्हाला यंदाच्या वर्षी प्रदर्शित करायचा होता. मात्र, आता प्लॅनमध्ये थोडे बदल झाले आहेत. लवकरच चित्रपटगृहात भेटूया... ख्रिसमसच्या शुभेच्छा!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'आज सलमानसोबत असतीस तर...', Vicky Kaushal सोबत 'असा' प्रवास करताना पाहून Katrina Kaif ला चाहत्यांनी केल ट्रोल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना आणि विजय सेतुपतीच्या 'मेसी क्रिसमस' या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत. श्रीराम राघवन यांनी अंधाधुन आणि बदलापुर सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कतरिना आणि विजय सेतुपतीनं 2021 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली होती. 'मला नेहमीच श्रीराम सरांसोबत काम करायचे होते, थ्रिलर स्टोरी सांगण्यात ते मास्टर आहेत आणि ते दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात काम करणे म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. या चित्रपटात विजय सेतूपतीसोबत काम करण्यासाठी मी उस्तुक आहे', असे कतरिना म्हणाली. दरम्यान, आता हा चित्रपट 2023 मध्ये हिंदी आणि तमिळ भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, कतरिना कैफचा 'भूत पुलिस' (Bhoot Police) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. तर लवकरच तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' (Tiger 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 'टायगर' (Tiger) या फ्रेन्चायझीचा तिसरा भाग आहे. तर या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ एकत्र दिसणार आहेत. (Katrina Kaif and Vijay Sethupathi Merry Christmas First Poster Out will release in 2023)