'या' खास व्यक्तीसोबत कतरिनाचा वाढदिवस साजरा,फोटो आले समोर

विकी नाही तर 'या' व्यक्तीसोबत कतरिनाचा बिकनी फोटोशुट 

Updated: Jul 16, 2022, 09:17 PM IST
'या' खास व्यक्तीसोबत कतरिनाचा वाढदिवस साजरा,फोटो आले समोर  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने आज, 16 जुलैला तिचा 39 वा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाचे तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत विकी कौशल दिसला नाहीये, तर त्याच्याऐवजी या खास व्यक्तीने हजेरी लावली होती.त्यामुळे या फोटोंची खुप चर्चा रंगली आहे.  

कतरिना कैफ शुक्रवारी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पती विकी कौशलसोबत मालदीवला रवाना झाली. कतरिनाने मालदीवच्या बीचवर तिच्या गर्ल्स गँगसोबत वाढदिवस साजरा केल्याची माहिती आहे. इंस्टाग्रामवर कॅटने मित्र आणि कुटुंबियांसोबत तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप एन्जॉय करताना दिसतेय.


 
फोटो शेअर करत कतरिनाने कॅप्शन लिहिले बर्थडे वाला दिन असे म्हटले आहे. तसेच फोटोमध्ये ती अभिनेत्री शर्वरी वाघसोबत मजेदार पोज देताना दिसत आहे. तसेच इतर फोटोत शर्वरी वाग, तिची बहीण इसाबेल आणि विकी कौशलचा भाऊ सनी कौशल देखील आहेत.

विकी कौशलची अनुपस्थिती
कतरिनाने शेअर केलेल्या फोटोत विकी कौशल दिसलाच नाही. त्याच्याऐवजी फोटोंमध्ये विकी कौशलला भाऊ सनी कौशल दिसला आहे. या गर्ल गॅंगसोबत तो देखील पोझ देताना दिसला आहे.