दिराच्या पोस्टवर कतरिनाची कमेंट वाचून चाहते चिंतेत

 विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर कतरिना कैफ सतत चर्चेत आहे.

Updated: Jan 4, 2022, 02:07 PM IST
दिराच्या पोस्टवर कतरिनाची कमेंट वाचून चाहते चिंतेत  title=

मुंबई : विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर कतरिना कैफ सतत चर्चेत आहे. कतरिनाने विकीशी लग्न केल्यापासून तिचे चाहते तिच्याबद्दलची प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. विकीचा भाऊ सनी कौशलही कतरिना वहिनी म्हणून मिळाल्याने खूप आनंदी आहे. 

दोघांच्या लग्नानंतर कतरिनाला 'परजाई जी' म्हणत सनीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक प्रेमळ पोस्टही शेअर केली आहे. अशा परिस्थितीत कतरिना आपल्या दिरावर प्रेमाचा वर्षाव करण्यापासून मागे कशी राहील? अलीकडेच, जेव्हा सनी कौशलने त्याच्या इंस्टाग्रामवर स्वत:चे काही स्टायलिश फोटो शेअर केले. तेव्हा त्याच्या परजाईने म्हणजेच कतरिनाने अशी कमेंट केली होती. जी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. सनीच्या फोटोवर कतरिनाची ही कमेंट तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

लग्नानंतर कतरिना ज्या पद्धतीने कुटुंबात मिसळली आहे, ते पाहून चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीयेत. खरंतर, नुकतंच सनी कौशलने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्चेया काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावर तिची वहिनी कतरिनाने 'वाइब है वाइब है' अशी कमेंट केली आहे.

सनी कौशलने शेअर केलेल्या  फोटोंमध्ये तो एका अनोख्या शेरवानीमध्ये दिसत आहे. या पोस्टवर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. पोस्टवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, "रणवीर सिंग विकी-कॅटच्या लग्नाला आला होता का?". 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर दुसर्‍या यूजरने लिहिलं की, ''बहुत गलत बात भाभी जी''. त्याचबरोबर आणखी एका यूजरने लिहिलं की, "तुम्ही रणवीर सिंगला कुठेही भेटला नाही का?". अशा अनेक मजेशीर कमेंट्स सनीच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.