शाहरुख खानच्या पत्नीनं सांगितलं कतरिनाचा इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक होण्याचं सत्य, म्हणाली...

कतरिनानं अकाऊंटवरून नाव बदलल्यानंतर तिचं अकाऊंट हॅक झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या...

Updated: Aug 4, 2022, 07:38 PM IST
शाहरुख खानच्या पत्नीनं सांगितलं कतरिनाचा इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक होण्याचं सत्य, म्हणाली... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, नुकतचं कतरिनानं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंटवरील नाव बदललं आहे. त्यामुळे तिचं अकाऊंट हे हॅक झालं की काय अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. कतरिनाच्या नावच्या जागी दुसऱ्या कोणत्या महिलेचं नाव तिथं दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर कतरिनाचं अकाऊंट हॅक झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी कतरिना कैफनं फ्लोरल प्रिंटमध्ये तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो प्रेक्षकांना प्रचंड आवडले. हे फोटो शेअर करत कतरिनानं सांगितलं की बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खानसोबत ती लवकरच एक मोठा प्रोजेक्ट घेऊन येणार आहे. हा एक स्पेशल प्रोजेक्ट असला तरी त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण कतरिनानं ही पोस्ट शेअर करताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बदल झाला. कतरिनाच्या नावाच्या जागी तिच्या अकाऊंटवर कॉमेडियन मॉडरेट दिसू लागलं. त्यासाठी कतरिनानं तिच्या अकाऊंटमध्ये हा बदलल केल्याचं म्हटलं जातं आहे.  त्यानंतर गौरीनं कतरिनाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये 'या मोठ्या प्रोजेक्टविषयी सगळ्यांना सांगण्यासाठी खूप उत्सुक आहे', असं गौरी म्हणाली. 

katrina kaif instagram account got hacked changed profile name screenshot going viral reason is shahrukh s wife gauri khan

कतरिनाच्या अकाऊंट हॅक झाल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या अकाऊंटचा स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत कतरिनाचं अकाऊंट हॅक झालं असं ही त्यांनी हा स्क्रिनशॉर्ट शेअर करत सांगितलं. पण असं काही झालं नाही कारण काही काळानंतर कतरिनानं कॉमेडियन मॉडरेट हे नाव बदलत स्वत: चं नाव पुन्हा एकदा अकाऊंटवर लिहिलं. आता काही लोकांनी कतरिनानं स्वत: अकाऊंटवरचं नाव बदललं असून ही एक प्रमोशनल स्ट्रॅटर्जी असल्याचं म्हटलं आहे. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच फोन भूतमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना कॉफी विथ करणच्या शोमध्येही दिसणार आहे. पण अभिनेत्री तिचा पती विकी कौशलसोबत कॉफी सोफ्यावर बसताना दिसणार नाही तर फोन भूत, इशान आणि सिद्धांतची स्टार कास्ट दिसणार आहे. याशिवाय फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.