कतरिना कैफ प्रेग्नंट? प्रत्येक कार्यक्रमात 'या' कारणामुळे एकटा जातोय विकी कौशल

Katrina Kaif and Vicky Kaushal : विकी कौशल कोणत्याही कार्यक्रमात कतरिना कैफसोबत का दिसत नाही. तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये सत्य आलं समोर...

दिक्षा पाटील | Updated: Sep 25, 2023, 03:37 PM IST
कतरिना कैफ प्रेग्नंट? प्रत्येक कार्यक्रमात 'या' कारणामुळे एकटा जातोय विकी कौशल title=
(Photo Credit : Social Media)

Katrina Kaif and Vicky Kaushal : बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ हे चर्चेत राहतात. कपल गोल म्हणून त्यांचे चाहते त्यांच्याकडे पाहत असतात. दरम्यान, त्यांचे जेव्हा पासून लग्न झालं आहे तेव्हापासून एकच चर्चा आहे की कतरिना कैफ ही प्रेग्नंट आहे. पण कधी त्या दोघांपैकी कोणीही किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीनं या बातमीला दुजावा दिला नाही. तर त्या दोघांनी एक गोष्ट सांगितली आहे की त्यांच्या कुटुंबाकडून बाळासाठी कोणतंही प्रेशर नाही. आता गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ही गोष्ट नोटिस केली की विकी सगळीकडे एकटा दिसत आहे. मग ते अंबानी यांच्या घरचा गणेशोत्सवाची पूजा किंवा मग कोणताही कार्यक्रम. मग, विकीसोबत त्याची पत्नी म्हणजेच विकी कौशल का दिसत नाही? प्रेग्नंट असल्यामुळे कतरिना कुठे जात नाही? अशी चर्चा सुरु आहे. 

कतरिना गेल्या अनेक दिवसांपासून लोकांसमोर येत नाही आहे. तर विकी कौशल रोज कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात एकटा दिसतो. त्यात प्रश्न उपस्थित राहत आहे की त्या दोघांमध्ये सगळं ठिक आहे ना किंवा मग कतरिना प्रेग्नंट आहे. त्यामुळे ती घरातून बाहेर पडत नाही. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ ही सध्या तिच्या कामाच्या कमिट्मेंट्समध्ये व्यस्त आहे. ती प्रेग्नंट नाही. सुत्रांनुसार, तिच्या प्रेग्नंसीच्या सगळ्या अफवा आहेत. त्यात काहीही सत्यता नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, कतरिना सध्या खूप व्यग्र आहे. त्यामुळे ती कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करताना दिसते. ती विकीसोबत गणेशोत्सव मंडळांमध्ये हजेरी का लावत नाही आहे तर त्याचे कारण कतरिना मुंबईत नसल्याचं सुत्रांनूसार समोर आली आहे. 

हेही वाचा : बापरे! परिणीतिच्या लग्नाचा 'हा' लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल 2500 तास

कतरिनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर कतरिना कैफ ही लवकरच स्पाय ड्रामा 'टाइगर 3' दिसणार आहे. तर यावेळी तिच्यासोबत सलमान खान आणि इमरान हाश्मी यांनी हजेरी लावली होती. त्यासोबत ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय मेरी क्रिसमस' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती विजय सेतुपतिसोबत दिसणार आहे. विकी कौशलविषयी बोलायचे झाले तर त्याचा द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटात दिसला. यानंतर विकी हा 'सॅम बहादुर' या चित्रपटात दिसणार आहे.