सलमानच्या 'या' स्पेशल गोष्टीसाठी कतरिना घेतेय भरपूर मेहनत, पाहा व्हिडिओ

सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

Updated: Jul 27, 2021, 09:21 PM IST
सलमानच्या 'या' स्पेशल गोष्टीसाठी कतरिना घेतेय भरपूर मेहनत, पाहा व्हिडिओ

मुंबई : 'टायगर 3' या सिनेमाचं शूटिंग मुंबईतील वायआरएफ स्टुडिओमध्ये सुरू झालं आहे. या चित्रपटात कतरिना कैफ सलमान खानसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमा संबंधीचे फोटो आणि व्हिडिओ समोर येऊ नयेत यासाठी शूटिंग भरपूर कडक सिक्योरिटीमध्ये केलं जात आहे की. या दरम्यान, कतरिनाने या चित्रपटासाठी तिला  देणार्‍या प्रशिक्षण प्रशिक्षकांसाठी सोशल मीडियावर एक एप्रिशियेशन पोस्ट शेअर केली आहे.

यासोबतच कतरिनाने 'टायगर 3'साठी तिच्या ट्रेनिंग संबंधित एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना स्ट्रेचपासून किकपर्यंत प्रशिक्षण घेताना दिसत आहे. या चित्रपटात ती अनेक अ‍ॅक्शन सीक्वेन्स करताना दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग सलमान खान आणि कतरिना कैफसाठी शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरणार आहे.

त्यामुळे दोन्ही स्टार आपल्या फिटनेसवर जबरदस्त काम करत आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती व्हाईट टॉप आणि ब्लॅक टाईट परिधान करुन तिचं ट्रेनिंग सत्र करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर  करत कतरिनाने लिहिलं आहे की, मी माझ्या शिक्षक आणि प्रशिक्षकांशिवाय काही नाही जे संयमपूर्वक माझ्याशी संबंधित आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिनापूर्वी सलमान खानने आपल्या जबरदस्त प्रशिक्षण सत्राचा एक व्हिडिओही शेअर केला होता. यात त्याची परफेक्ट बॉडी दिसली होती. टायगर सिनेमा विषयी सांगायचं तर या सिनेमाचं शूटिंग खूप आधी सुरू होणार होतं पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हे शक्य झालं नाही. या फ्रेंचायझीचे शेवटचे दोन चित्रपट हिट झाले आहेत. पहिल्या दोन चित्रपटांमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफची जोडीही पाहायला मिळाली.