Pornography Case : 'स्त्री' फेम अभिनेत्रीचा खुलासा, 'राज कुंद्राशी कधीच संपर्कात नव्हते'

आता एका अभिनेत्रीनं या प्रकरणाला मिळणारी वळणं पाहता केलं लक्षवेधी वक्तव्य 

Updated: Jul 27, 2021, 08:41 PM IST
Pornography Case : 'स्त्री' फेम अभिनेत्रीचा खुलासा, 'राज कुंद्राशी कधीच संपर्कात नव्हते'
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सॉफ्ट पॉर्नोग्राफी केस (Soft Pornography Case) प्रकरणी राज कुंद्रा याच्याशी संबंधित बरीच माहिती समोर येऊ लागली आहे. त्याच्या बँक खात्यांपासून ते अगदी परदेशी व्यवहार आणि कलाविश्वात असणाऱ्या अनेक संपर्कांबाबतही खुलासा केला जात आहे. अशातच आता एका अभिनेत्रीनं या प्रकरणाला मिळणारी वळणं पाहता, यातून आपल्याला दूर लोटत राज कुंद्राशी कधीही संपर्कात नव्हते ही बाब स्पष्ट केली आहे. 

हॉरर कॉमेडी 'स्त्री' या चित्रपटामध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री फ्लोरा सैनी हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणी आपली बाजू मांडली. राज कुंद्रा आणि त्याचा सहाय्य़क (असिस्टंट) उमेश कामत यांच्यातील व्हॉट्स अॅप चॅटमध्ये तिच्या नावाचाही उल्लेख झाल्याची बाब कळताच तिनं हे पाऊल उचललं. 

आपल्याबाबत सुरु असणाऱ्या सर्व चर्चा तिनं धुडकावून लावत आपण कधीही राज कुंद्रा किंवा कामतशी संपर्कात नव्हते हा मुद्दा अधोरेखित केला. 'माझ्याकडे त्यांचे दूरध्वनी क्रमांकही नाहीत. त्यांच्यापैकी कोणाशीच मी कधीही संवाद साधलेला नाही', असं ती या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे. 

Raj Kundra Case : पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ व्हायरल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Flora Saini (@florasaini)

दरम्यान, मुंबई न्यायालयानं राज कुंद्राला पॉर्नोग्राफी केस प्रकरणी 14 दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 19 जुलैला त्याला सदर प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्यासोबतच इतर 11 जणांनाही पोलिसांनी अटक केली होती. 

 

पोलिसांची कारवाई सुरु असतानाच राज कुंद्राच्या बँक खात्यांवरही गुन्हे शाखेनं कारवाई करण्यास सुरुवात केली. मुंबई गुन्हे शाखेनंही राज कुंद्राला अडचणीत आणलं आहे. गुन्हे शाखेनं कारवाई करत राज कुंद्रा याचं सिटी आणि कोटक महिंद्रा या बँकेतील खातं फ्रीज केलं आहे.