KBC च्या 'या' स्पर्धकामुळे बिग बींना वाटला गर्व

कोण आहे ही व्यक्ती 

KBC च्या 'या' स्पर्धकामुळे बिग बींना वाटला गर्व

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' हा फक्त एक टीव्ही शो नाही तर एक असा मंच जिथे लोकं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. अनेक स्पर्धक इथे पैसे कमावयला येतात पण मनात कुठेतरी महानायक अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी देखील येतात. त्यांना बिग बी यांना भेटून खूप आनंद होतो. पण काही स्पर्धक असे असतात ज्यांना अमिताभ बच्चन यांना भेटून गर्व वाटतो. असाच क्षण KBC च्या बुधवाराच्या भागात पाहायला मिळाला. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाचा परिचय करून देताना स्वतः बिग बी खूप खूष होते. त्यांना या स्पर्धकाचा आनंद वाटत होता. 

KBC 10: हॉट सीट पर आया कोई ऐसा कि अमिताभ बच्चन ने महसूस किया गर्व

हे स्पर्धक होते मनीष पाटील. मनीष पाटील हे सफाई कर्मचारी असून ते महानगर पालिकेत काम करतात. मनीष यांना आपला परिचय देऊन त्यांना ज्या संकटांना सामोरे जावे लागते ते स्क्रिनवर दाखवण्यात आले. हे पाऊन अमिताभ यांच्या डोळ्यात देखील पाणी आले. त्यानंतर बिग बी म्हणाले की, मला आनंद आहे ज्या हॉट सीटवर मोठ मोठे लोक येतात तिथे एक सफाई कर्मचारी देखील येतो. 

पुढे बिग बी म्हणाले की, ही खरंच गर्वाची गोष्ट आहे की, एक व्यक्ती ज्याने सफाईची जबाबदारी घेतली आहे तो देखील आज या हॉट सीटवर आहे. मनीष आपल्या कामाबद्दल भरपूर उत्साहित आहेत. त्यांना गर्व आहे की ते सफाईचं काम करतात. 

मनीष पाटील यांच्या मनातील सल

मनीष यांनी आपलं दुःख बोलून दाखवलं की, गेले 2 वर्ष मी माझ्या मुलाची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. त्याला गेल्या 2 वर्षांपासून क्रिकेट कोचिंग आणि किट देऊ शकलो नाही याची खंत असल्याचं सांगितलं. केबीसीमधून पैसे जिंकल्यावर ते सर्वात पहिलं हेच काम करणार आहेत. आनंदाची बाब म्हणजे मनीष केबीसीमधून 12.50 लाख जिंकले. एवढंच काय तर मनीष यांच्या मुलाला खेळ संपल्यावर हॉट सीटजवळ बोलवून क्रिकेट किट देखील भेट म्हणून दिली.