KGF स्टार यशच्या गोंडस मुलाचा व्हिडिओ व्हायरल, पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री

KGF स्टार यशचे सिनेमा आता बॉलिवूडला टक्कर देताना दिसत आहेत. त्यांचं एक छान सुंदर कुटुंब देखील आहे. त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे.

Updated: Jul 17, 2022, 06:26 PM IST
KGF स्टार यशच्या गोंडस मुलाचा व्हिडिओ व्हायरल, पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री title=

मुंबई : KGF सुपरस्टार यश हा दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पण त्यांच्या सिनेमांना हिंदी प्रेक्षकांकडून ही भरभरून प्रेम मिळतंय. यश एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला पती आणि पिता देखील आहे. अलीकडेच यशचा गोंडस मुलगा त्याच्यावर रागावला आहे. अभिनेत्याची पत्नी राधिका पंडित हिने दोघांचा एक क्यूट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिनेत्री राधिका पंडितने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radhika Pandit (@iamradhikapandit)

राधिका कन्नड स्टार 

राधिका पंडित ही कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. यशसोबत तिची पहिली भेट 2007 मध्ये एका टीव्ही शोदरम्यान झाली होती ज्यामध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि त्यांनी एकत्र 'ड्रामा' आणि 'मिस्टर अँड मिसेस रामाचारी' सारख्या अनेक हिट कन्नड चित्रपटांमध्ये काम केले.

यश आणि राधिका यांनी 2016 मध्ये लग्न केले. 2018 मध्ये मुलगी आयरा आणि 2019 मध्ये यथर्वचा जन्म झाला. मात्र, दोन्ही मुलांच्या जन्मानंतर राधिकाने अभिनयातून ब्रेक घेतला आणि सध्या ती कमबॅक करण्याच्या मूडमध्ये नाही.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या यशच्या 'KGF Chapter 2' चित्रपटाने 2022 मध्ये जगभरात सर्वाधिक कलेक्शन केले आहे. प्रशांत नीलच्या चित्रपटापासून चाहते यशच्या पुढच्या प्रोजेक्टच्या घोषणेची वाट पाहत आहेत, परंतु त्यांनी अद्याप याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.