बहिणीचे बाथरुममधील फोटो व्हायरल, अखेर जान्हवीला द्यावं लागलं हे उत्तर

जान्हवी कपूरने लिहिले, 'मी तुझ्या हातावर चावू शकते का ?' 

Updated: Aug 18, 2021, 07:17 AM IST
बहिणीचे बाथरुममधील फोटो व्हायरल, अखेर जान्हवीला द्यावं लागलं हे उत्तर

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूरने नुकतेच तिचे काही फोटोज इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने हे फोटोज बाथरुममध्ये  क्लीक केले आहेत. याआधी आणखी एका अभिनेत्रीचं बाथरुममधील हॉट अंदाजातील फोटोशूट कमालीचं चर्चेत होतं.

खुशी कपूरने नुकतीच अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया कपूरच्या वेडिंग पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी सर्व स्टार्स अगदी बोल्ड अंदाजात पार्टीमध्ये दिसून  आले. त्यात खुशी देखील मागे नव्हती. तिने पांढऱ्या रंगाचा डिप नेक ड्रेस घातला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by(@khushi05k)

 या लूकमधील काही 'बाथरूम सेल्फी' तिने शेअर केले आहेत. तिच्या या  फोटोंवर अभिनेत्री जान्हवी कपूर आणि चुलत बहिण शनाया कपूर यांनी स्टारकिडच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

तिच्या ड्रेसबद्दल विशेष सांगायचं झालं तर , खुशी कपूरने पफ स्लीव्हसह फुलांची प्रिंट असलेला पांढऱ्या रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला होता. फोटोवर प्रतिक्रिया  देताना जान्हवी कपूरने लिहिले, 'मी तुझ्या हातावर चावू शकते का ?' 

त्यानंतर शनायाने ही अनेक कमेंट्स केल्या आहेत. ती लिहिते, 'हे कुठे आहे.' डिझायनर मसाबा गुप्ता यांचा 'बाथरूम आणि हा ड्रेस.' आलिया कश्यपने मुकुट आणि  पांढऱ्या हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.