Khusi Kapoor Dating Rumors: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे जान्हवी कपूर आणि खुशी कपूर हिची. खुशी कपूरचा पहिला डेब्यू चित्रपट येत्या 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे सध्या तिचीच चर्चा आहे. यावेळी ती याच चित्रपटातील एका कोस्टारला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या यावरून खुशी कपूर त्याच्या प्रेमात आहे का याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगते आहे. यावेळी द आर्चिजमधून ती बेटी कूपर हिच्या भुमिकेतून दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे खुशीच्या अभिनयाचीही बरीच चर्चा आहे. त्याचसोबत तिच्या या नव्या लुकची बरीच चर्चा आहे. खुशी कपूरसोबत वेदांग रैना, मिहीर अहूजा, सुहाना खान, अगस्त्या नंदा, अदिती डॉट, युवराज मेदिया असे बरेच कलाकार आहेत. सध्या या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. ट्रेलरही सध्या बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय झाला आहे.
यावेळी ती वेदांग रैनाला डेट करत असल्याची चर्चा आहे. खुशी कपूरचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून तिचे पार्टी फोटोही बरेच व्हायरल होताना दिसतात. मध्यंतरी तिचे काही फोटो हे व्हायरल झाले होते. ज्यात ती ऑरीसोबतही दिसली होती. यावेळी त्यांच्या या पार्टीला बाकीचेही स्टारकीड्स आले होते. त्यामुळे त्यांच्या फोटोंची बरीच चर्चा रंगलेली होती. यावेळी वेदांग रैनाही त्यांच्या या पार्टीत होता. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत का याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
हेही वाचा : आमिर खानच्या लेकीनंतर 'या' दिग्गज अभिनेत्याच्या मुलीचं केळवण; #anandi म्हणून इन्स्टावर फोटो व्हायरल
काही दिवसांपुर्वीच तिनं आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी तिची बरीच चर्चा रंगलेली होती. यावेळी वेदांग रैनाही तिच्या वाढदिवसाला उपस्थित होता. यावेळी जान्हवी कपूरही त्याच्या रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत दिसली होती. त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. परंतु सध्या याची फक्त चर्चा सुरू आहे. यावर त्या दोघांपैंकीही कोणाही शिक्कामोर्तब केलेला नाही. परंतु त्यांच्या डेटिंग रूमर्सची सध्या चांगलीच चर्चा आहे.
जान्हवी कपूरनं 2018 साली डेब्यू केला होता. आता तिची सख्खी बहीण खुशी कपूर यावर्षी डेब्यू करते आहे. द आर्चिज या चित्रपटावरही प्रचंड टीका झाली होती. त्यातून हा चित्रपट नेपोटिझमला पुढाकार देतो आहे अशीही बरीच चर्चा होती.