लाल ड्रेसमध्ये 'दिलबर दिलबर' गर्ल नोरा फतेहीचा गजब डान्स

 दोघेही ऑटोतून ऊतरतात आणि रस्त्यावर डान्स करायला सुरूवात करतात. 

Updated: Jul 29, 2018, 01:05 PM IST
लाल ड्रेसमध्ये 'दिलबर दिलबर' गर्ल नोरा फतेहीचा गजब डान्स  title=

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री नोरा फतेही सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयतेमधील दिलबर दिलबर गाण्याने 'हंगामा' केलायं. लवकरत ती सलमान खानच्या 'भारत'मध्ये दिसणार आहे. नोराने एमटीव्ही शो ट्रोल पुलिसतूनही तिने आपली ओळख बनविली आहे. याव्यतिरिक्तही ती आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. नोरा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले व्हिडिओ आता व्हायरल व्हायला लागले आहेत. नोराने kiki चॅलेंजचे व्हिडिओ बनवले आहेत. यामध्ये ती वरूण धवनसोबत डान्स करताना दिसत आहे. जगभरात #InMyFeelings हॅशटॅगने हे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. 

 

Look the new me is really still the real me  anups_ Hair n Makeup zoya.makeupandhair Styling @megstier #norafatehi #new #picoftheday #india #morocco #mumbai #onelove #style #mood #love #expression #realshit #hairgoals #hair #makeup #naturalmakeup

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

काय आहे kiki चॅलेंज ? 

‘In My Feelings’ कॅनेडियन रॅपर ड्रेकचा लेटेस्ट अल्बम ‘Scorpion’ मधील एक गाणं आहे.

सर्वात मजेदार गोष्ट ही आहे की लोक हे चॅलेंज स्वीकारुन खूप मजेशीर व्हिडिओ बनवत आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियात सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. सोशल मीडियावर नजर टाकली तर सगळीकडे kiki चॅलेंजचे व्हिडिओ पाहायला मिळतात.

नोरानेही हे चॅलेंज स्वीकारत व्हिडिओ पोस्ट केलाय.

यामध्ये ती लाल रंगाची साडी घातलेली दिसतेय. वरूण धवनसोबत बोलताना ती दिसतेय. त्यानंतर थोड्या वेळातच ते ‘KEKE DO YOU LOVE ME’गाण्यावर डान्स करायला सुरूवात करतात. दोघेही ऑटोतून ऊतरतात आणि रस्त्यावर डान्स करायला सुरूवात करतात.