'मला कायम आठणीत ठेवा...', अभिनेत्याचं गंभीर आजाराने निधन, शेवटची पोस्ट चर्चेत

वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास, रुग्णालयातील शेवटचा फोटो, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल  

Updated: Jul 3, 2022, 07:58 AM IST
'मला कायम आठणीत ठेवा...', अभिनेत्याचं गंभीर आजाराने निधन, शेवटची पोस्ट चर्चेत  title=

मुंबई : कलाविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. यशाचं उच्च शिखर चढत असताना अभिनेत्याचं कर्करोगाने घात केला आहे. वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेता किशोर दासचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो कर्करोगाशी लढत होता. पण किशोरदार या लढाईवर मात करु शकला नाही. किशोर दासवर चेन्नईत चौथ्या स्टेजच्या कॅन्सरवर उपचार सुरू होते. काही काळ अभिनेत्यावर गुवाहाटी येथे उपचारही झाले. 

किशोर दासने गेल्या महिन्यात रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो रुग्ण्यालयाच्या बेडवर दिसत होता. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर दास केवळ कॅन्सरने त्रस्त नव्हता तर त्याला कोविडची ही लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या समस्या आणखी वाढल्या होत्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच सोशळ मीडियावर चाहत्यांनी श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनावर चाहत्यांनीही सतत शोक व्यक्त केला आहे.

रुग्णालयातील फोटो पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
अभिनेता म्हणाला, 'जे तुम्हाला मारु शकत नाही, तेच तुम्हाला मजबूत बनवू शकते... माझ्या केमोथेरपीचा हा चौथा टप्पा आहे. तुम्हाला वाटत असेल हे सोप आहे. पण तसं नाही. मला थकवा, मळमळ, चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या असे साईड ईफेक्ट होत आहेत.'

अभिनेता पुढे म्हणाला,  'त्रास होतोय पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मी इतर कोणतेही औषध घेऊ शकत नाही. लवकरचं बरा होईल अशी अपेक्षा करतो. उपचार पूर्ण झाल्यानंतर ट्यूमर लक्षणीय प्रमाणात कमी होईल. मला कायम तुमच्या आठणीत ठेवा... ' असं देखील किशोर दासने पोस्टमध्ये लिहिलं आहे.