कर्नाटकच नशिब बदलणाऱ्या कुमारस्वामींच 'शोले'सोबत आहे हे कनेक्शन

हे आहे शोले कनेक्शन

कर्नाटकच नशिब बदलणाऱ्या कुमारस्वामींच 'शोले'सोबत आहे हे कनेक्शन  title=

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2018 चा निकाल आता समोर आला आहे. 12 मे रोजी झालेल्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला भाजपला 107, काँग्रेसला 72 आणि जेडीएसला 41 जागा मिळाल्या आहे. कर्नाटक निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत दिसलेला कुमारस्वामी हा चेहरा आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून समोर आला आहे. काँग्रेसकडून सिद्धारमैया मुख्यमंत्र्याच्या रांगेत आहे. भाजपकडून येदियुरप्पादेखील यामध्ये सहभागी झाले आहे. 

जनता दलाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पूर्व मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी चन्नापट्टना आणि रामनगर विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढत होते... आणि रामनगरच्या जागेवर निवडणून आले आहेत. रामनगर हे शहर 70 च्या दशकातील ब्लॉकबस्टर सिनेमा 'शोले'च्या शुटिंगमुळे चर्चेत आले होते. कुमारस्वामी यांच नातंदेखील या जागेसोबत आहे. शोले सिनेमांत अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र लीड रोलमध्ये होते. या सिनेमाला आजही प्रेक्षक अधिक पसंद करतात. 

या सिनेमांत अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंद केलं आहे. या सिनेमांत हेमा मालिनी यांनी अधिक लोकप्रियता मिळवली. या सिनेमामुळे रामनगर हे अतिशय लोकप्रिय झालं आहे. या सिनेमांत रामनगरमधील डोंगर भागदेखील दाखवण्यात आला आहे.