मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनन्याने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवकोंडासोबत (Vijay Deverakonda) करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ (Koffee With Karan 7) मध्ये हजेरी लावली होती. सध्या ते दोघं त्यांचा आगामी चित्रपट 'लायगर' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, दोन्ही कलाकार करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण 7' (Koffee With Karan 7) च्या सातव्या पर्वात पोहोचलं. यावेळी करण जोहरने दोघांनाही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले, ज्याची त्यांनी उत्तरेही दिली. दरम्यान, करणने विजयला असा प्रश्न विचारला, ज्याला अभिनेत्याने अतिशय मजेशीर उत्तर दिले. नुकतेच रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते, ज्याची खूप चर्चा होत आहे.
करणनं विजयला रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरून एक प्रश्न विचारला, विजय देवरकोंडा आंतरराष्ट्रीय मासिकासाठी न्यूड पोज देणार का? यावर उत्तर देताना विजय म्हणाला, जर ते चांगलं शूट असेल तर मला त्यात काही अडचण नाही.
यानंतर करण विजयला विचारतो की, 'जर त्याला कधी कंडोम ब्रँडची जाहिरात करण्याची संधी मिळाली तर तो करेल का?' करणच्या प्रश्नाला उत्तर देताना विजय म्हणाला, 'मला वाटतं की जर तुम्हाला 10 मुलं नको असतील तर हे करणं स्मार्ट आणि सुरक्षित आहे. माझा या जाहिरातीला काही विरोध नाही. यानंतर, करण अनन्याला विचारतो, 'तिला विजयला न्यूड बघायचं आहे का?', ज्यावर तिनं उत्तर दिलं की विजयला न्यूड पाहण्यात तिला कोणतीही अडचण येणार नाही. तिने ‘लायगर’ या चित्रपटाच्या पोस्टवरमध्ये विजयला थोडेसे न्यूड पाहिले आहे. 'लायगर' चित्रपटाच्या एका पोस्टरसाठी विजय न्यूड झाला होता. एक पोस्टर समोर आलं होतं ज्यात विजय कपड्यांशिवाय दिसला.'
दरम्यान, विजयच्या 'लायगर' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अभिनेता पूर्णपणे न्यूड दिसला होता. पोस्टरमध्ये त्यांनी पुढच्या बाजूला गुलाबांचा पुष्पगुच्छ धरला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात अभिनेता बॉक्सरची भूमिका साकारणार आहे.पुरी जगन्नाथ दिग्दर्शित आणि चित्रपट निर्माता करण जोहर निर्मित हा चित्रपट पुढील महिन्यात 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.