मुंबईः सोशलाइट कोर्टनी कार्दशियन तिचा प्रियकर ट्रॅव्हिस बार्करसोबत इटलीमध्ये रोमँटिक व्हेकेशन एन्जॉय करत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये ट्रॅव्हिससोबत एंगेजमेंट केल्यानंतर दोघांनी नुकतेच लास वेगासमध्ये अनौपचारिक लग्न केले. आता हे जोडपे त्यांच्या 'हनिमून'साठी इटलीत दाखल झालं आहे.
इटलीमध्ये दोघेही निवांत क्षण घालवत आहेत. या दरम्यानचे काही फोटो कोर्टनीने शेअर केले आहेत.यात एक फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ब्रालेस होत ग्रीन ड्रेसमधील हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. याव्यतिरिक्त कोर्टनीच्या प्रेंग्नसीच्याही चर्चांना उधाण आलं आहे.
कोर्टनीने लेक कोमोमधील तिच्या खोलीची झलक असलेले स्वतःचे फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये कोर्टनी ग्रीन कलरचा बॉडी हगिंग ड्रेस पाहायला मिळतो. कोर्टनी ग्रीन कलरचा बॉडी हगिंग ड्रेस बघायला मिळतो. या हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये कोर्टनीची फिगर स्पष्ट दिसत आहे.
कोर्टनीच्या या ब्रेलेस ड्रेसशिवाय तिच्या प्रेग्नेंसीबद्दलही लोक अंदाज लावत आहेत. एका यूजरने लिहिले- 'मी एकटाच आहे का तिचा बेबी बंप दिसतोय?' दुसऱ्याने लिहिले- 'निश्चितपणे प्रेग्नंट'. दुसऱ्या युजरने लिहिले- 'गरोदर दिसत आहे.' इतर अनेक वापरकर्त्यांनी कोर्टनीच्या गरोदरपणावर टिप्पणी केली आहे.
कोर्टनीने लेक कोमो हॉटेल आणि लेकचे फोटोही शेअर केले आहेत. ट्रॅव्हिससोबत त्यांची डेट नाईट, कॉफी डेट्ससह अनेक सुंदर ठिकाणेही तिनं शेअर केली आहेत. कोर्टनी आणि ट्रॅव्हिस यांनी गेल्या महिन्यात ग्रॅमी अवॉर्ड्सनंतर कोणतीही घोषणा न करता लग्न केलं.