kriti Sanon ने बिग बींसोबत रोमॅन्टिक डान्स करत दिली प्रेमाची कबुली, पण...

 क्रिती सेनन या शोमध्ये तिचे प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे.

Updated: Oct 23, 2021, 01:33 PM IST
kriti Sanon ने बिग बींसोबत रोमॅन्टिक डान्स करत दिली प्रेमाची कबुली, पण...

मुंबई : कौन बनेगा करोडपती या क्विझ रिअ‍ॅलिटी शोमध्ये दर शुक्रवारी सेलिब्रिटी हजेरी लावतात. जे एका उदात्त कारणासाठी शोमध्ये खेळतात. काही चांगल्या कामासाठी ते या शोमधून जिंकलेली रक्कम देतात. क्रिती सेनन आणि राजकुमार राव पुढील आठवड्यात शोमध्ये दिसणार आहेत.

क्रिती सेनन आणि राजकुमार राव त्यांच्या आगामी 'हम दो हमारे दो' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. हा चित्रपट 29 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. क्रिती सेनन या शोमध्ये तिचे प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे.

क्रितीने अमिताभ बच्चन यांना केले प्रपोज

समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये कृती गुडघ्यावर बसून अमिताभ बच्चन यांना प्रपोज करताना दिसत आहे. त्यानंतर ती बिग बींसोबत तिच्या लुका छुपी चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये क्रिती रेड कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

क्रिती आणि अमिताभ बच्चन यांना नाचताना पाहून संपूर्ण प्रेक्षक आनंदी असल्याचे दिसते. त्याचबरोबर राजकुमार राव सुद्धा बाजूला उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. प्रोमो शेअर करताना, सोनी टीव्हीने लिहिले - कृती सेनन एबी सरांना तिचे प्रेम व्यक्त करेल आणि एक सुंदर वातावरण तयार करेल. प्रेमाने भरलेला हा क्षण चुकवू नका. असं म्हटलं आहे.