प्रभाससोबत 'या' अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; जाणून घ्या कारण

लवकरच देणार गोड बातमी 

Updated: Mar 12, 2021, 09:56 AM IST
प्रभाससोबत 'या' अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; जाणून घ्या कारण title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. या फोटोंतून अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेननच्या (Kriti Sanon)  चाहत्यांना गुड न्यूज मिळणार आहे. हे दोन्ही तारे लवकरच एकत्र येणार आहेत. 

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. जो फोटो 'आदिपुरूष' (Adipurush) या सिनेमाचा आहे. या सिनेमात प्रभास, क्रिती सेनन आणि सनी सिंह एकत्र दिसणार आहे. या तिघांचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

'बाहुबली' फेम अभिनेता प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने दोन फोटो शेअर केलेत. यामध्ये प्रभाससोबत क्रिती सेनन आणि सनी सिंह दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत या तिघांसोबत दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) देखील दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रभासने केलं स्वागत 

प्रभासने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिली आहे की,'क्रिती सेनन आणि सनी सिंह यांचं 'आदिपुरूष' या परिवारात स्वागत. या पोस्टला चाहत्यांनी खूप पसंती दिली असून कमेंट्स ही केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Om Raut (@omraut)

केव्हा रिलीज होणार सिनेमा 

आदिपुरूष हा सिनेमा 8 ऑगस्ट 2020  मध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा ओम राऊत दिग्दर्शित करणार आहे. ओम राऊत या अगोदर अजय देवगनच्या 'तानाजी' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. हा सिनेमा तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळमसह हिंदी सिनेमात रिलीज होणार आहे. या सिनेमात सैफ अली खान देखील लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे.