'वन नाईट स्टँड'नंतर सुरू झाली 'या' कॉमेडियनची लव्ह स्टोरी

 प्रेम ही भावना अमर्याद आहे. म्हणूनचं म्हणतात प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं, असतो तो फक्त आणि फक्त अनुभव. 

Updated: May 30, 2021, 09:39 AM IST
'वन नाईट स्टँड'नंतर सुरू झाली 'या' कॉमेडियनची लव्ह स्टोरी title=

मुंबई : प्रेम ही भावना अमर्याद आहे. म्हणूनचं म्हणतात प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं, असतो तो फक्त आणि फक्त अनुभव. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कपल्स आहेत, त्यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगाता, फक्त लव्ह स्टोरी लक्ष केंद्रीत केलं. यामध्ये अनेक कलाकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे कॉमेडियन कृष्णा अभिषेक. कृष्णाने त्याच्या विनोद बुद्धीने चाहत्यांच्या मनात घर केलं. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. पण कृष्णा त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. 

अभिनेत्री कश्मीरा आणि कृष्णाने त्यांच्या नात्याबद्दल  एक बोल्ड खुलासा केला. त्यांच्या प्रेमाची सुरूवात वन नाईट स्टँड'नंतर झाली. कृष्णाने सांगितलं होतं की, 'एकदा झालं असं की आम्ही कारमध्ये बसलो होतो आणि लाईट्स गेली.' त्यानंतर मी म्हणालो, 'आता काय करायचं?....' त्या रात्रीनंतर कश्मीराला कळालं कृष्णा आपली काळजी घेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फक्त काळजी नाही, तर तो तिच्यासाठी जेवण देखील घेवून यायचा. कृष्णा आणि कश्मिरा यांची पहिली भेट 'और पप्पू पास हो गया' या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघे कधीचं वेगळे झाले नाहीत. कृष्णाच्या मनात कश्मीराबद्दल सॉफ्ट कॉर्नर होतं आणि हे कश्माराला ठावूक देखील होतं. 

जेव्हा कृष्णाला कश्मीराचं लग्न झालं आहे, हे कळाल्यानंतर तो निराश झाला. पण त्यानंतर त्याला कळालं की कश्मीरा आणि तिचा पती विभक्त होत आहेत. कश्मीराच्या या परिस्थितीत कृष्णाने तिला भक्कम साथ दिली. कश्मीरा, कृष्णापेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठी आहे. कश्मीराने पतीला घटस्पोट दिल्यानंतर दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. 

या कपलने डान्स रियालिटी शो 'नच बलिये'मध्ये भाग देखील घेतला होता. याच दरम्यान कृष्णा आणि अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या नात्याची चर्चा रंगली आहे. तेव्हा रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला. कृष्णाने 'नच बलिये'च्या सेटवर कश्मीराला लग्नासाठी मागणी घातली.