लता मंगेशकर करण जोहरवर भडकल्या?

काय म्हणाल्या लता दिदी 

लता मंगेशकर करण जोहरवर भडकल्या?

मुंबई :करण जोहरने 'लस्ट स्टोरीज' या सिनेमाची घोषणा केल्यानंतर हा विषय जोरदार चर्चेत रंगला आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केलं आहे. या सिनेमांतील सगळ्या कलाकारांच भरभरून कौतु केलं जातं. आगे.  मात्र आता या सिनेमांतील एका सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या सिनेमांत कियारा आडवाणीचं मास्टरबेशन सीन दाखवण्यात आलं आहे. यामध्ये 'कभी खुशी कभी गम' मधील लता मंगेशकर यांच्या एव्हरग्रीन गाण्याचा वापर केला आहे. 

का भडकल्या लता दिदी?

 करण जोहरच्या कथेतील  क्लायमॅक्स अनेकांना सरप्राईज देऊन गेला. मात्र काहींना ही गोष्ट पटलेली नाही. यावर अग्रस्थानी आहेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कुटुंबाचे. लता मंगेशकर यांचे कुटुंब करणवर नाराज असल्याचे कळत आहे. मीडियाशी बोलताना लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील एका सदस्याने आपली ही नाराजी बोलून दाखवली. ‘करण जोहरला एका भजनसदृश गाण्याला या सीनमध्ये वापरण्याची गरजचं का पडली, हे आमच्यासाठी एक कोडेच आहे. या गाण्याऐवजी करण जोहर दुसरे कुठलेही गाणे वापरू शकला असता.

करणने या गाण्याला कशा पद्धतीने वापरले, हे लतादीदी ज्या वयात आहे, त्या वयात आम्ही त्यांना सांगूही शकत नाही. त्यांना कळावे, अशी आमची इच्छाही नाही. दीदींनी करणच्या ‘कभी खुशी कभी गम’चे हे गाणे रेकॉर्ड केले होते. त्यावेळी करण प्रचंड खूश झाला होता. कारण आपल्या चित्रपटासाठी लता दीदींनी गावे, हे त्याचे स्वप्न होते.  त्याने स्वत: लता दीदींसमोर या भावना व्यक्त केल्या होत्या आणि आज त्याने लता दीदींनी गायलेल्या गाण्यासोबतचं हे सगळे केले. त्याचा नको तेथे वापर केला, असे  मंगेशकर कुटुंबातील या सदस्याने म्हटले.