K K Death Mystery | केकेच्या मृत्यूचं गूढ वाढलं?

ख्यातनाम गायक केकेच्या आकस्मिक (K K Death) मृत्यूनं अख्खा देश हळहळला.

Updated: Jun 1, 2022, 08:36 PM IST
K K Death Mystery | केकेच्या मृत्यूचं गूढ वाढलं?  title=

कोलकाता :  ख्यातनाम गायक केकेच्या आकस्मिक (K K Death) मृत्यूनं अख्खा देश हळहळला. पण आता त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत सस्पेन्स निर्माण झालाय. केकेच्या शरीरावर जखमा आढळल्यानं त्याच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट. (legendary bollywood singer kk aka krishnakumar kunnath death mystery)

दुर्दैवानं यापुढं आता केकेच्या चाहत्यांना हेच शेवटचे पल आठवणीत जपून ठेवावे लागणार आहेत. छोड आए हम वो गलियाँ या गाण्यानं बॉलिवूडमधल्या करिअरची सुरूवात करणारा सिंगर केके आता कायमचं हे जग सोडून निघून गेलाय. 

वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी, लाईव्ह कॉन्सर्टनंतर केकेचा आकस्मिक मृत्यू झाला. मात्र त्याच्या डोक्यावर आणि ओठांवर जखमा आढळल्यानं मृत्यूचं गूढ वाढलंय.  पोस्टमार्टेममध्ये मृत्यू कशामुळं झाला, याचा उलगडा होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून आयोजक आणि ग्रँड हॉटेलच्या स्टाफची चौकशी सुरू केलीय. कॉन्सर्ट आयोजकांच्या चुकांमुळंच केकेचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झालीय.

आयोजकांच्या चुकीमुळं मृत्यू? 

कोलकात्याच्या गुरूदास कॉलेजमध्ये सिंगर केकेची कॉन्सर्ट झाली. या कॉन्सर्टला चाहत्यांची तुफान गर्दी उसळली होती. नजरूल मंच ऑडिटोरियमच्या क्षमतेपेक्षा तिप्पट प्रेक्षक जमले होते. 

त्यांना हटवण्यासाठी फायर एक्सटिंग्विशरमधून धूर सोडण्यात आला. स्टेजवरचे एसी बंद असल्यानं प्रचंड उकडत होतं. याचा त्रास होऊन केकेची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येते.कार्यक्रम आटोपून तो हॉटेलवर गेला आणि तिथंच कोसळला.

हा सगळा घटनाक्रम पाहता केकेच्या कॉन्सर्टदरम्यान प्रेक्षक संख्या मर्यादेपेक्षा जास्त होती का? रंगमंचावरचा एसी बिघडला होता का? आणि आयोजकांच्या या चुकांमुळंच केकेचा मृत्यू झाला का? याचा तपास कोलकाता पोलीस आता करत आहेत.. या तपासातूनच केकेच्या मृत्यूचं गूढ उकलणाराय.