'तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर 'फँड्री' फेम अभिनेत्रीची प्रतिक्रिया

राजेश्वरीच्या या पोस्टच्या सध्या सर्वत्र चर्चा आहेत.   

Updated: Mar 31, 2021, 05:27 PM IST
'तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर 'फँड्री' फेम अभिनेत्रीची प्रतिक्रिया title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' सिनेमातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राजेश्वरी अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून भन्नाट प्रतिसाद मिळत आहे. तर कमेंटमध्ये तिच्या एका चाहत्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली आहे. चाहत्याच्या या मागणीला राजेश्वरीने भन्नाट उत्तर दिलं आहे. राजेश्वरीच्या या उत्तरामुळे तिची ही पोस्ट तुफान चर्चेत आहे. राजेश्वरीने फेसबूकवर फोटो  पोस्ट केला आहे. 

'नेटकऱ्याने कंमेंटमध्ये लिहिले, ‘आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून घरी आली पहिजेल’ चाहत्यांच्या या कमेंटवर राजेश्वरी म्हणाली, ‘आणि माझ्या आयुष्याचे काय’ राजेश्वरीची ही कमेंट सध्या तुफान व्हायरल होत आहे. राजेश्वरी बद्दल सांगायचं झालं तर, ती कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. 

राजेश्वरी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करत असते. राजेश्वरीची अदा पाहून चाहते घायाळ होत असतात. तिने फोटो किंवा व्हीडिओ सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो.