'या' प्रसिद्ध सिंगरचा म्युझिक व्हिडिओमध्ये न्यूड डान्स

चाहत्यांसह सेलेब्सकडूनही हे गाणं पसंत केलं जात आहे. 

Updated: Jul 31, 2021, 10:03 PM IST
'या' प्रसिद्ध सिंगरचा म्युझिक व्हिडिओमध्ये न्यूड डान्स

मुंबई : अमेरिकन सिंगर लिल नास एक्सच्या नवीन म्युझिक व्हिडिओने संपूर्ण हॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे. 22 वर्षीय रॅपरने त्याचं नवीन गाणं नुकतंच रिलीज केलं आहे. ज्याचं नाव 'इंडस्ट्री बेबी' आहे. लिल नास एक्स कडून अपेक्षेप्रमाणे, त्याचा संगीत व्हिडिओ बराच वेगळा आणि मेमोरेबल आहे. 'इंडस्ट्री' बेबी गाणं लिल नास एक्सने जॅक हार्लोसोबत गायलं आहे आणि हे गाणं कन्या वेस्ट निर्मित आहे.

इंडस्ट्री बेबीच्या म्युझिक व्हिडीओमध्ये अनेक आश्चर्यकारक क्षण होते, पण ज्यातला एक सीन म्हणजे तो पूर्णपणे न्यूड दिसत आहे. होय, गाण्याच्या एका भागामध्ये, लिल नास एक्स जेलमधील त्याच्या जोडीदारांसोबत शॉवर घेत आहे आणि त्या वेळी तो पूर्णपणे नग्न आहे. त्याच्यासोबत त्याच्या सर्व तुरुंगातील साथीदारांनाही नग्न दाखवण्यात आलं आहे. मात्र या गाण्यात सर्वांवर  पिक्सेलेशनचा वापर केला गेला आहे.लिल नास एक्सच्या या गाण्यात रॅपर निकी मिनाज आणि पॉप सिंगर जस्टिन बीबर यांची नावंही नमूद करण्यात आली आहेत.चाहत्यांसह हॉलिवूड सेलेब्सकडून हे गाणे पसंत केलं जात आहे. 

या गाण्याच्या प्रेस रिलीझमध्ये, लिल नास एक्सने त्याच्या 20 वर्षांच्या सौंदर्याला एक डेडिकेशन देखील दिलं आहे. हाच तो काळ होता जेव्हा तो त्याच्या गाण्याला ओल्ड टाउन रोडला प्रचंड यश मिळवू पाहत होता. मॅसेजमध्ये लिहिलं आहे की, 'मला माहित आहे की, तुमची सेक्सुअलिटी तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये वेगळी वाटते. मला माहित आहे की, जगाततलं सगळ्यात हिट गाणं देण्यापासून तुमच्या अपार्टमेंटमध्ये अडकणं किती जड आहे. आणि मला हे देखील माहित आहे की, जर तुम्ही 'वन हिट वंडर' सारखी गोष्ट पुन्हा ऐकली तर तु धुमाकूळ घालशील.  माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही पुढे जावं