Guess Who : 'या' साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : प्रसिद्ध अभिनेत्रीने काही काळापुर्वीच सोशल मीडियावर स्वत:चा बालपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी आईसोबत पोहोचली आहे. आईने तिला आपल्या कुशीत घेऊन समुद्र किनारी पोज दिली आहे. या फोटोमध्ये ती लहानपणी खुपच गोंडस दिसत होती. 

Updated: Feb 3, 2023, 09:46 PM IST
Guess Who : 'या' साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील प्रसिद्ध अभिनेत्रीला (Famous Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे.  

 

हे ही वाचा : कियारा अडवाणीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर? पाहा Photo

 

फोटोत काय?

प्रसिद्ध अभिनेत्रीने काही काळापुर्वीच सोशल मीडियावर स्वत:चा बालपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी आईसोबत पोहोचली आहे. आईने तिला आपल्या कुशीत घेऊन समुद्र किनारी पोज दिली आहे. या फोटोमध्ये ती लहानपणी खुपच गोंडस दिसत होती. हा फोटो पाहून तुम्हाला या अभिनेत्रीला ओळखायचे आहे. 

ही अभिनेत्री बॉलिवूडची नसून साऊथ इंडस्ट्रीतली आहे. तिने अनेक सिनेमात काम केले आहे. तिचे हे सिनेमे हिट देखील ठरले आहेत. तसेच ती तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जाते. ती एकमेव अशी अभिनेत्री जिला मेक अपची गरज भासत नाही. नो मेक अप लुकसाठी ती खुप प्रसिद्ध आहे. तिचे नो मेक अप लुकचे फोटो चाहत्यांना खुप आवडतात. आता तिची इतकी ओळख सांगितल्यानंतर तुम्हाला तिची ओळख नक्कीच पटली असेल. 

 

हे ही वाचा : डिंपल कपाडियाची नात बॉलिवूड अभिनेत्रींवर पडतेय भारी, Photo पाहिलेत का?

 

जर अजूनही तुम्हाला ही अभिनेत्री ओळखता येत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो ही अभिनेत्री साई पल्लवी आहे. फोटोमध्ये साई पल्लवी (Sai pallavi) तिच्या आईसोबत बीचवर दिसत आहे. हा तिचा बालपणीचा फोटो आहे, जो तिने काही काळापूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी साई पल्लवी (Sai pallavi) प्रत्यक्षात खूप हुशार विद्यार्थिनी आहे. तिने 2016 मध्‍ये जॉर्जियाच्‍या स्‍टेट मेडिकल युनिव्‍हर्सिटी तिबिलिसी येथून एमबीबीएस पूर्ण केले आहे.

साई पल्लवी (Sai pallavi) बऱ्याच काळापासून साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने 2005 मध्ये बालकलाकार म्हणून कस्तुरी मान या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच चित्रपटांव्यतिरिक्त, साई पल्लवी लहानपणापासून अनेक टीव्ही मालिका आणि शोमध्ये देखील दिसली आहे. 2008 मध्ये तिने विजय टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. यानंतर 2008 मध्ये 'धाम धूम' या तमिळ चित्रपटात तिने उत्कृष्ट अभिनय केला.

साई पल्लवी (Sai pallavi) तमिळ व्यतिरिक्त मल्याळम आणि तेलगू सारख्या भाषांमध्येही चित्रपट केले आहेत. तिला 2015 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर अवॉर्ड, SIIMA फिल्म अवॉर्ड, वनिता फिल्म अवॉर्ड आणि IBNlive अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत.2018 मध्ये, तिला सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.