'इतकं ईमानदार असूनही...' लोकसभा निकालानंतर अनुपम खेर यांची सूचक पोस्ट

Loksabha Election 2024 : देशभरात सध्या एकच मुद्दा सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी असून, हा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीचा. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या वाट्याला आलेल्या जागा पाहता देशात आता सत्तेसाठीचं राजकारण नवं वळण घेताना दिसू शकतं.   

सायली पाटील | Updated: Jun 5, 2024, 01:06 PM IST
'इतकं ईमानदार असूनही...' लोकसभा निकालानंतर अनुपम खेर यांची सूचक पोस्ट title=
loksabha Election 2024 results actor Anupam kher shares noticable post latest update

Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांची एकंदर आकडेवारी आता जाहीर झाली असून, एनडीए आणि इंडिया आघाडीच्या वाट्याला आलेल्या जागा आणि मित्रपक्षांसमवेत निवडून आलेल्या इतर लहान पक्षांची संख्या पाहता सत्तास्थापनेसाठीचं गणित नेमकं कोणाला झुकतं माप देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

लोकसभा निवडणुकीचा यंदाचा निकाल एकतर्फी लागला नसून, एनडीएच्या (NDA) वाट्याला 292 आणि इंडिया (I.N.D.I.A.) आघाडीच्या वाट्याला 234 जागा गेल्या आगेत. इतर पक्षांचे मिळून 17 उमेदवार निवडून आले असून, बहुमताचा आकडा गाठताना आता भाजपची दमछाक होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्ती केली आहे. इथं ही परिस्थिती असतानाच तिथं कलाजगतातील मंडळींनीसुद्धा स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक म्हणून या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. 

ज्येष्ठ नेते आणि परखडपणे आपली मतं मांडणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांनीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सूचक पोस्ट केली. कोणाचंही नाव न घेता त्यांनी केलेली ही पोस्ट पंतप्रधान आणि भाजपसाठी असल्याचा कयास काहींनी लावला. खेर यांच्या त्याआधीच्या पोस्ट हा कयास बांधण्य़ास कारणीभूत ठरल्या होत्या. 

पोस्टमध्ये खेर यांनी काय लिहिलं? 

कभी कभी सोचता हूँ कि
ईमानदार व्यक्ति को बहुत 
ज्यादा ईमानदार नहीं होना
चाहिए|

जंगल में सीधे तने वाले पेड ही
सबसे पहले काटे जाते हैं| 

बहुत ज्यादा ईमानदार व्यक्ति 
को ही सबसे ज्यादा कष्ट उठाने 
पडते हैं| 

पर फिर भी वह अपने ईमानदारी 
नहीं छोडता| 

इसीलिए करोंडो लोगों के लिए 
प्रेरणा का स्त्रोत बनता है| 
जय हो| 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

हेसुद्धा वाचा : 'पाकिटमारी करून कीर्तिकरांची जागा चोरली' राऊतांचा हल्लाबोल, 'ते' पत्र अन् निवडणूक निकालावरून इशारा

 

असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आणि ही पोस्ट शेअर करत असताना त्यासोबत 'सच्चाई' हा एक शब्द कॅप्शनमध्ये लिहिला. अनुपन खेर यांनी यापूर्वी केलेल्या पोस्ट पाहता कंगना राणौत आणि एकंदर भाजपच्या बाजूनं ते अप्रत्यक्षरित्या बोलत आल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्यामुळं निवकणुकीच्या निकालानंतर त्यांची ही सूचक पोस्ट अनेकांचं लक्ष वेधताना दिसत आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.