अभिनेत्री मधुरा देशपांडे अडकली विवाहबंधनात

सध्या लग्नसराईचा मोसम सुरु आहे. बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टीत अनेकजण बोहल्यावर चढतायत. गेल्यावर्षीही मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. 

Updated: Jan 20, 2018, 04:14 PM IST
अभिनेत्री मधुरा देशपांडे अडकली विवाहबंधनात

मुंबई : सध्या लग्नसराईचा मोसम सुरु आहे. बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टीत अनेकजण बोहल्यावर चढतायत. गेल्यावर्षीही मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. 

त्यानंतर आता कन्यादान, इथेच टाका तंबू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुरा देशपांडे विवाहबंधनात अडकलीये. आशय गोखले हिच्याशी ती विवाहबद्ध झालीये.

आशय गोखले पेशाने आर्किटेक्ट आहे. तसेच आशय रिबन्स अँड बलून्समध्येही भागीदार आहे. गेल्या वर्षी मराठी सिनेसृष्टीतील शशांक केतकर, रोहन गुजर, आरोह वेलणकर, प्रार्थना बेहेरे हे सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकलेत.