आ रा रा रा.... माधुरीला पाहून पुन्हा चाहते म्हणतायत 'मार डाला'; तुम्ही पाहिला का तिचा हा लूक?

माधुरीचा भन्नाट लूक पाहून तुम्हीही म्हणाल, 'मार डाला'  

Updated: Sep 26, 2022, 02:55 PM IST
आ रा रा रा.... माधुरीला पाहून पुन्हा चाहते म्हणतायत 'मार डाला'; तुम्ही पाहिला का तिचा हा लूक? title=

मुंबई : वयाच्या 55 व्या वर्षी देखील अभिनेत्री माधुरी दीक्षितचं (Madhuri Dixit) सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालतं. बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थातचं माधुरी दीक्षितच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. वयाच्या पन्नासाव्या वर्षी देखील माधुरीचं सौंदर्य इतरांना लाजवेल असं आहे. सौंदर्यासोबतचं देवाने तिला भेट म्हणून नृत्य कलेचं वरदान दिलं आहे. माधुरीच्या चाहत्यांची संख्या (Madhuri Dixit Fan) फार मोठी आहे. अनेक मुली माधुरी सारखं दिसण्याचा प्रयत्न करतात. फक्त मुलचं नाही तर माधुरीच्या सौंदर्याने मुली देखील घायाळ होतात. 

90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि नृत्याने (Madhuri Dixit Dance) सर्वांच्या मनात घर करणारी माधुरी आजही लोकप्रिय आहे. माधुरीने सोशल मीडियावर लेहंग्यातील काही फोटो पोस्ट केले  आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटो पोस्ट करत माधुरीने कॅप्शनमध्ये, 'Maja Ma!' असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. माधुरी दीक्षित डान्सिंग स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. माधुरी दीक्षितची स्टाईल तिच्या फॅन्सना नेहमी आवडते.आपल्या डान्स आणि अभिनयामुळे ती असंख्य तरुणांसाठी आदर्श ठरली आहे. 

फ्लोरल डिटेलिंग केलेल्या माधुरीचा लेहंगा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. घेर असलेल्या लेहेंग्यावर फ्लोरल प्रिंटचे पॅचवर्क अतिशय आकर्षक व सुंदर दिसत आहेत. सध्या माधुरीचा लूक प्रचंड व्हायरल होत आहे.