'महाभारता'तील बलाढय 'भीमा'नं घेतला जगाचा निरोप, अखेरच्या वेळी पैशांची चणचण?

सूत्रांच्या माहितीनुसार आजारपणासोबत त्यांना आर्थिक चणचणही भासू लागली होती असं म्हटलं गेलं

Updated: Feb 8, 2022, 11:14 AM IST
'महाभारता'तील बलाढय 'भीमा'नं घेतला जगाचा निरोप, अखेरच्या वेळी पैशांची चणचण?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'महाभारत' (Mahabharat) या पौराणिक कथानक असणाऱ्या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. एक काळ गाजवणारी ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. आजही कित्येत असे प्रेक्षक आहेत, जे ही मालिका डाऊनलोड करुन पाहतात. 

मालिकेतील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. पण, आज मात्र या मालिकेतील एका अतिशय लोकप्रिय व्यक्तीनं या जगाचा निरोप घेतला आहे. 

ही व्यक्ती म्हणजे मालिकेत 'भीम' साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती.  (Praveen Kumar Sobti) वयाच्या 74 व्या वर्षी सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गेल्या काही काळापासून सोबती आजारी असल्याची माहिती समोर आली. आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आजारपणासोबत त्यांना आर्थिक चणचणही भासू लागली होती असं म्हटलं गेलं. 

पण, हे सत्य नसल्याचंही सोबती यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं. 

गेल्या वर्षी प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांनी झी न्यूजला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी आपल्या पायांना दुखापत झाल्याचं सांगितलं.

वय वाढलं असलं तरीही आपण, आजही त्याच ताकदीनं आयुष्य जगत असल्याचं ते म्हणाले. वाढलेलं वय मी मानत नाही, ही संकल्पना फक्त डोक्यात असते, असंही ते म्हणाले होते. 

ऑलिम्पिकमध्येही झालेले सहभागी... 
मुळच्या पंजाब येथील असणाऱ्या प्रवीण सोबती यांनी खेळातही चांगला सहभाग घेतला होता. हॅमर आणि डिस्कस थ्रो, थाळीफेक यामध्ये ते सक्रिय होते. 

आशियायी आणि कॉमनवेल्थ खेळांमध्ये ते सहभागी झाले होते. इतकंच नव्हे, तर ऑलिम्पिकमध्येही त्यांनी देशाचं प्रसिनिधीत्वं गेलं होतं.