गरोदरपणानंतर 10 दिवसात 10 किलो वजन कमी, Gauahar Khan नं करुन दाखवलं

Gauahar Khan : गौहर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून सोशल मीडियावर तिनं काही पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नंसी जर्नी विषयी सांगितलं होतं. आता गौहर खाननं चक्क 10 दिवसात 10 किलो वजन कमी केलं आहे. त्याविषयी तिनं पोस्ट शेअर करत सगळ्यांना सांगितलं आहे.

दिक्षा पाटील | Updated: May 25, 2023, 04:51 PM IST
गरोदरपणानंतर 10 दिवसात 10 किलो वजन कमी, Gauahar Khan नं करुन दाखवलं title=
(Photo Credit : Gauahar Khan Instagram)

Gauahar Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्संसीमुळे चर्चेत आहे. गौहर तिच्या प्रेग्नंसीविषयी सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अपडेट देत होती. गौहरनं वयाच्या 39 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. अशात गौहर खाननं 10 मे रोजी एका मुलाला जन्म दिला. सध्या गौहर ही मातृत्वाचा आनंद घेत आहे. पण त्याचसोबत गौहर तिच्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. गौहर पोस्ट प्रेग्नंसीचे तिचे अनेक रुटीन्स सांगताना दिसते. प्रेग्नंसीनंतर वाढत वजन पाहता तिनं 10 दिवसात तब्बल 10 किलो वजन कमी केलं आहे. 

गौहर खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. गौहरनं शेअर केलेल्या या फोटोत तिनं नाईट सुट परिधान केल्याचे दिसत आहे. या फोटोत गौहर पाऊट करत आहे तर तिनं केस मोकळे सोडले आहेत. गौहरनं शेअर केलेल्या या फोटोत तिनं कॅप्शन दिलं आहे की 'मी प्रसूतीनंतर 10 दिवसात 10 किलो वजन घटवले आहे. अजून 6 किलो वजन कमी करायचे आहे.' गौहरची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Gauahar Khan lose 10 kg weight in 10 days know in details

खरंतर प्रेग्नंसी आधी गौहर खूप बारिक होकी. प्रेग्नंसी दरम्यान, गौहर हेल्दी झाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा पहिल्या सारखं होण्यासाठी गौहर तिच्या फिटनेसकडे लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिनं नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोत ती खूप बारिक झाल्याचे पाहायला मिळत आहे. गौहरची ही स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. गौहरच्या ट्रान्सफॉर्मेश्न पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : त्याला धृतराष्ट्र आणि गांधारी सिंड्रोम आहे; Nawazuddin Siddiqui च्या वक्तव्यावरून अभिनेत्यानं केलं ट्रोल

गौहरच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिनं जैद दरबारशी लग्नगाठ बांधली आहे. गौहरनं तिच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. यावेळी गौहर आणि जैद यांनी सांगितले की 'आम्हाला मुलगा झाला आहे. सलाम ऊ अलैकुम, या सुंदर जगात तुझे स्वागत', अशी पोस्ट त्यांनी केली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

गौहर खान तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिची प्रेग्नंसी जर्नी सगळ्यांसोबत शेअर करत होती. यावेळी तिनं सांगितलं की प्रेग्नंसीमध्ये देखील ती काम करत होती.पण प्रत्येक व्यक्तीसाठी हा वेगळा अनुभव असतो. जर कोणाला जमत नसेल तर त्यांनी आराम करावा.