आईच्या निधनानंतर 'या' लोकप्रिय अभिनेत्यानं गमावलं वडिलांचं छत्र

प्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर; आईच्या निधनानंतर एका महिन्यात वडिलांना देखील गमावलं   

Updated: Nov 16, 2022, 05:06 PM IST

Actor Krishna Death:  दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता महेश बाबूनं आईच्या निधनानंतर एका महिन्यात वडिलांचं छत्र देखील गमावलं आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर महेश बाबू आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा घट्टमनेनी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. 

महेश बाबूचे वडील कृष्णा
महेश बाबूचे वडील कृष्णा (superstar krishna) हे प्रसिद्ध तेलुगू अभिनेते होते. त्यांच्या निधनाने तेलुगू सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून सांगितले की, कृष्णा घट्टमनेनी यांनी वयाच्या 79 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने (cardiac arrest) हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. (mahesh babu father krishna age)

टॉलिवूडचे प्रसिद्ध सुपरस्टार कृष्णा यांना 13 नोव्हेंबर रोजी कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला होता. रिपोर्ट्सनुसार, कृष्णा रूटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच चर्चा होती. पण मंगळवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं आहे. 

काही दिवसांपूर्वी महेश बाबूच्या आई आणि कृष्णा (krishna actor wife) यांच्या पत्नी इंदिरा देवी यांचं निधन झालं. कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू 8 जानेवारी 2022 रोजी दीर्घ आजारामुळे निधन झालं. नंतर 28 सप्टेंबर रोजी इंदिरा देवी यांचे निधन झाले. (krishna mahesh babu father)

कृष्णा यांनी 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून ते यशस्वी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून कायम सर्वांच्या लक्षात राहतील. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराीने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी आंध्र विद्यापीठातून डॉक्टरेटही पदवीही घेतली होती. (actor krishna sons and daughters)