Arbaaz Khan and Giorgia Andriani : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) मार्ग आता कायमचे वेगळे झाले आहेत. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे, तर दुसरीकडे अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला (Giorgia Andriani) डेट करत आहे. एवढंच नाही तर, दोन्ही कपल्सने त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला आहे. अनेक ठिकाणी मलायकाला अर्जूनसोबत तर, अरबाजला जॉर्जिया स्पॉट करण्यात येतं.
नुकताच एका टॉक शोमध्ये अरबाजने जॉर्जियासोबत असलेल्या नात्याच्या खुलासा केला आहे. जॉर्जियामध्ये अशी कोणती गोष्ट होती जी अरबाजला प्रचंड आवडली याबद्दल अभिनेत्याने मोकळेपणाने सांगितलं आहे.
अरबाज म्हणाला, 'जेव्हा तुम्ही कोणत्या नात्यामध्ये असाल, तर त्याबद्दल तुम्ही पुढचा विचार करत नाही. आमच्या नात्यात आम्ही एका अशा टप्प्यावर आहोत, जेथे आम्ही नातं कसं पुढे नेवू शकतो याचा विचार करत आहोत.' (giorgia andriani age)
जॉर्जियामधील ही गोष्ट अरबाजला प्रचंड आवडते
जॉर्जियाचा आनंदी स्वभाव अरबाजला प्रचंड आवडतो. जॉर्जिया आणि अरबाज कोरोना काळात एकत्र होते. सोशल मीडियावर जॉर्जिया कायम अरबाजसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करायाची. (giorgia andriani instagram)
अरबाजचा आगामी सिनेमा
अरबाज खान लवकरच 'पटना शुक्ला' सिनेमात काम करताना दिसणार आहे. सिनेमात अरबाज खान आणि मलायकाचा मुलगा अरहान खानही सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणार आहे.