नाव न घेता कोणावर इशारा? महेश भट्ट म्हणाले, 'लोक म्हातारे होतात पण 'मोठे' नाही'

Mahesh Bhatt: महेश भट्ट हे आपल्या लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखले जातात. सध्या त्यांचे एक व्यक्तव्य हे चर्चेत आहे. ज्यात त्यांनी वाढत्या म्हातारपणाबद्दल आपलं स्पष्ट मतं मांडले आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत आपण पाहुया. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 19, 2023, 04:23 PM IST
नाव न घेता कोणावर इशारा? महेश भट्ट म्हणाले, 'लोक म्हातारे होतात पण 'मोठे' नाही'  title=
mahesh bhatt says aging is not a problem as we all have to accept it

Mahesh Bhatt: महेश भट्ट यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली असते. त्यामुळे सध्याही त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. महेश भट्ट यांचे वयही आता 70 च्या पुढे आहे. महेश भट्ट अनेकदा वादातही अडकलेले असतात. मध्यंतरी त्यांचे आणि रिया चक्रवर्ती हिचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. ज्यावरून बराच वादंगही निर्माण झाला होता. त्यानंतर ते दोघंही ट्रोल झाल्यावर एका कार्यक्रमातून त्यांनी आपल्या या फोटोवरून झालेल्या वादावर भाष्य केले होते. त्यात ते म्हणाले होते की त्यांना अशा कोणत्याच गोष्टींवर काहीच फरक पडत नाही त्यातून अशाच ट्रोलर्सकडे ते फारसे लक्षही देत नाहीत. त्यांचा हा व्हिडीओही जोरात व्हायरल झाला होता. सध्या त्यांची अशीच एक चर्चा रंगलेली आहे. 

खरंतर म्हातारं होणं हे काही आपल्या हातात नसतं. त्यातून वय कधी आणि कसं वाढत जाईल आणि त्यातून वाढत्या वयाचा आपल्या रूपावरही काय परिणाम होईल हेही काहीच सांगता येत नाही. परंतु हे आपण थांबवू शकत नाही. यावरीलच महेश भट्ट यांचे एक व्यक्तव्य सध्या जोरात चर्चेत आहे. महेश भट्ट यांनी अनेक नामवंत कलाकारांना बॉलिवूडमध्ये स्थान दिले आहेत. त्यातून त्यांनी अनेकांचे करिअरही घडवले आहे. अनेक स्टारही हे आजही फार लोकप्रिय आहेत. त्याचसोबत त्यांना या इंडस्ट्रीतला अनुभवही फार मोठा आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, वेळ जसा पुढे जातो त्याप्रमाणे आपण म्हातारपणही स्विकारलं पाहिजे. नक्की त्यांना काय सुचित करायचे आहे. या लेखातून आपण सविस्तर जाणून घेऊया. 

हेही वाचा : ना अल्लू अर्जुन ना प्रभास; रजनीकांत, शाहरूखचा रेकॉर्ड तोडणार 'हा' दाक्षिणात्य सुपरस्टार

'दैनिक जागरण'शी बोलताना ते म्हणाले की, 'प्रत्येक कलाकार, प्रत्येक फिल्ममेकरची एक वेळ असते. त्यानंतर प्रत्येकालाच म्हातारपणाला सामोरे जावे लागते. म्हातारपणं हा तर निसर्गाचा नियमच आहे. त्यानंतर प्रत्येक माणूस हा जाताना आपला वारसा हा पुढच्या पिढीकडे देतो. जेव्हा वरिष्ठ लोकं असं म्हणतात की आम्हीच वर राहणार दुसरं कोणीच राहणार नाही. ही गोष्ट जी ते सतत गर्वानं वारंवार म्हणताना दिसतात त्यांना तर हे अजिबातच शोभा देत नाही. माझी मुलगी आलिया ही सुद्धा माझ्या मताशी सहमत आहे. तिही असं म्हणते की आपल्याकडे लोकं म्हातारे होतात, मोठे नाही. (बुढे होते हैं, बडे नहीं)

तुमचा बॅंक बॅलन्स किती आहे याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही मुळात तुम्ही तुमच्या विचारांनी किती मोठे आहेत हे पाहिले जाते. तेव्हा तुम्हाला इतरांकडूनही प्रेरणा मिळते. नाहीतर अशावेळी तुम्ही फक्त स्वत:लाच आरशात पाहत राहू. आपण स्वत:ला सावरणं हे महत्त्वाचं आहे. त्यातून जोपर्यंत तुम्ही अडखळत नाही, पडत-धडपडत नाही तोपर्यंत तुम्ही शिकू शकत नाही.