'ऐकतं कोण तुला', असं म्हणणाऱ्याला महेश काळेंचे कडक उत्तर

कलाकार ट्रोलिंगच्या जाळ्यात 

Updated: Apr 12, 2021, 08:19 PM IST
'ऐकतं कोण तुला', असं म्हणणाऱ्याला महेश काळेंचे कडक उत्तर

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण कोणत्याही गोष्टीवर व्यक्त होतो. राजकारण, सामाज, खेळ, अभिनय प्रत्येक गोष्टींवर आज आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडता येतं. कलाकार देखील सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. दुसरी बाजू म्हणजे सोशल मीडियावर नेटकरी कलाकारांना ट्रोल देखील करतात. काही कलाकार या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. तर काही मात्र सडेतोडपणे उत्तर देतात. 

असचं काही घडलं आहे प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्यासोबत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. फोटोवर एका नेटकऱ्याने 'ऐकतं कोण तुला' असं म्हटलं आहे. त्यावर महेश काळे यांनी देखील कडक उत्तर दिले आहे. 

‘भिमसेन एकच होऊ शकतात… तू तर नाकात गातो एवढ कर्कश कोण ऐकत कोण तूला…’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यावर महेश म्हणाले ‘खरं आहे, एकच होऊ शकतात ते. असाच आवाज देवाने दिला आहे तर काय करु आता. मला पण कळत नाही का आवडतो लोकांना ते. तुम्ही सुखरुप रहा.’