माझी बाय गो बाय... अशी गावरान Love Story कधीच पाहिली नसेल...

डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडीओ पाहाच   

Updated: Apr 15, 2022, 05:59 PM IST
माझी बाय गो बाय... अशी गावरान Love Story कधीच पाहिली नसेल...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सगळं सेम असतं.... असं आपण कायम ऐकलं असेल, म्हटलंही असेल. किंबहुना कोणा एका व्यक्तीवर जिवापाड प्रेमही केलं असेल. प्रेमला कसलीच परिभाषा कळत नाही, सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून याचाच अंदाज येत आहे. 

प्रेम रंग, रुप काहीच पाहतच नाही. तर, प्रेम नात्यांमध्ये असणारा ओलावा आणि विश्वास पाहतं आणि त्या बळावर बहरतंसुद्धा. 

कोणत्याही चित्रपट गीतालाही मागे टाकेल अशा वेगानं हे गाणं आणि त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. फक्त सोशल मीडियाच नव्हे तर लग्न, हळदीसमारंभांमध्येही हे गाणं वाजत असल्याचं लक्षात येत आहे. 

स्वप्तील पाटीलच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या गाण्यामध्ये निक शिंदे आणि श्रद्धा पवार हे मुख्य चेहरे झळकत आहेत. अतिशय लहानशी पण तितकीच मन जिंकणारी प्रेमकहाणी गाण्यातून साकारण्यात आली आहे. 

प्रेम कायमच चांगले दिवस दाखवतं असं नाही, पण जेव्हा हेच प्रेम आव्हानात्मक दिवस दाखवतं तेव्हा हक्काच्या माणसाची साथ किती महत्त्वाची असते हे सांगताना गाणं एक सुरेख संदेशही देऊन जातं. 

सुरेख चित्रीकरण, गीतरचना आणि कलाकारांचा न्याय देणारा अभिनय पाहून तुम्हीही या गाण्यावर ठेका धराल यात वाद नाही. 

विश्वास बसत नाहीये? गाण्याचा व्हिडीओ नक्की पाहा...