Major Teaser: सलमान ख़ानने रिलीज़ केला 'मेजर'चा हिंदी टीझर, म्हणाला... याला म्हणतात धमाकेदार टीझर

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या मेजर बायोपिकचा हिंदी टीझर सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट तेलगू भाषेत बनविण्यात आला आहे. 

Updated: Apr 12, 2021, 09:46 PM IST
 Major Teaser: सलमान ख़ानने रिलीज़ केला 'मेजर'चा हिंदी टीझर, म्हणाला... याला म्हणतात धमाकेदार टीझर

मुंबई : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या मेजर बायोपिकचा हिंदी टीझर सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट तेलगू भाषेत बनविण्यात आला आहे. हा सिनेमा मल्याळम आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती तेलुगु सिनेमा सुपरस्टार महेश बाबू यांनी केली आहे. तर दिग्दर्शक शशी किरण टिक्का यांनी केलं आहे

टीझर शेअर करत सलमानने लिहिलं आहे की, याला म्हणतात धमाकेदार टीझर. याला लॉन्च केरुन मला खरोखर खूप आनंद झाला आणि अभिमान देखील वाटत आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना सलाम. टीझरमध्ये मेजरच्या शाळेच्या दिवसांपासून ते मुंबईतील हॉटेल ताजवरील दहशतवादी हल्ल्यापर्यंतच्या दृष्यांना कव्हर केले आहे. २००८ मधील या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला.

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी उंची दाखवत देशासाठी शहीद झाले. या चित्रपटात आदिवी शेषा मेजर संदीपच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचवेळी, सई मांजरेकर तिच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. प्रकाश राज देखील या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. शोभिता धुलीपाला एनआरआयच्या भूमिकेत दिसणार आहे.हा टीझर सोमवारी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात प्रदर्शित झाला, यावेळी या चित्रपटाच्या स्टारकास्टचा समावेश होता. यामध्ये तेलगू माध्यमांना आमंत्रित करण्यात आलं होतं, तर उर्वरित भाषांच्या माध्यमांना वर्चुअली समाविष्ट केले गेलं.

अदिवी शेषने ट्रेलर लॉन्च इवेंट सांगितलं की, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.कारण ही असा सिनेमा आहे. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यासाठी बनवण्यात आला आहे. हा तेलुगू टीझर महेश बाबू यांनी सोशल मीडियावर रिलीज केला आहे, तर मल्याळमचा टीझर पृथ्वीराज सुकुमारन रिलीज केला आहे. हा चित्रपट 2 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.