Coronavirusवर अक्षय कुमारने केली मात, पत्नी ट्विंकल खन्नाने सांगितले आता कशी आहे अक्षयची तब्येत

ट्विंकल खन्नाने तिच्या ऑफिशल इन्स्टाग्राम अकाउंटवर एका मोनोक्रोम कॅरिकेचरमध्ये एका कपलचा फोटो शेअर केला आहे. या चित्राद्वारे तिने अक्षय कुमारच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

Updated: Apr 12, 2021, 09:36 PM IST
Coronavirusवर अक्षय कुमारने केली मात, पत्नी ट्विंकल खन्नाने सांगितले आता कशी आहे अक्षयची तब्येत

मुंबई : बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता अक्षय कुमार याच्या चाहत्यांसाठी खूश खबर आहे. अक्षयने कोरोना विषाणू विरोधातली लढाई जिंकली आहे. अक्षयलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अक्षय कुमारच्या प्रकृतीची माहिती त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांनी दिली आहे. अक्षय कुमारच्या प्रकृतीबाबत ट्विंकलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

ट्विंकल खन्नाने तिच्या ऑफिशल इन्स्टाग्राम अकाउंटवर एका मोनोक्रोम कॅरिकेचरमध्ये एका कपलचा फोटो शेअर दाखवला आहे. या चित्राद्वारे तिने अक्षय कुमारच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ट्विंकल खन्नाने चित्राच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की सर्व काही ठीक आहे आणि त्याला परतलेलं पाहून फार बरं वाटत आहे. ट्विंकल खन्नाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

ट्विंकल आणि अक्षय कुमारचे चाहते तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. तसंच, कमेंन्ट देवून, अक्षयच्या कोरोनावर मात केल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. अक्षय कुमारला कोरोना विषाणूची लागण झाली होती. तेव्हा त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक लेटर शेअर केलं होते. ज्यामध्ये अक्षयने आपल्या जवळच्या नातेवाईकांना गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची तपासणी करण्याचे आवाहनही केले होते.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने आपल्या बहुचर्चित 'रामसेतु' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा स्क्रिन शेअर करणार आहेत. आतापर्यंत रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्तिक आर्यन, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रमेश तिवानी, सतीश कौशिक, दक्षिण भारतीय अभिनेत्री बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळी अनेक प्रसिद्ध स्टार्सनाही कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे.