'मर्द को दर्द नही होता' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'उरी'चे निर्माते रॉनी स्क्रूवाला आणखी एक दमदार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत

Updated: Mar 8, 2019, 05:18 PM IST
'मर्द को दर्द नही होता' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशलच्या 'उरी: द सर्जिकल स्टाइक'ने बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला जमवला. आता पुन्हा 'उरी'चे निर्माते रॉनी स्क्रूवाला आणखी एक दमदार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून 'मर्द को दर्द नही होता' या चित्रपटाची चर्चा होती. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या विविध पोस्टर्समुळे चित्रपटाबाबत चर्चा होत होती. अखेर आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अभिमन्यु दसानी व्यतिरिक्त चित्रपटात राधिका मदान, महेश मांजरेकर, जिमित त्रिवेदी आणि गुलशन देवैया प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

'मर्द को दर्द नही होता' ही अशा व्यक्तीची कहाणी आहे ज्याला कधीच वेदना होत नाहीत. लहानपणी ज्या गोष्टीचा त्रास व्हायचा त्याचा गोष्टीला त्याने मोठेपणी ताकद बनवली असल्याची ही गोष्ट आहे. वसन बाला दिग्दर्शित 'मर्द को दर्द नही होता' चित्रपट २१ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.