मलायका अरोराचा विकी आणि कतरिनाच्या लग्नाशी काय आहे संबध?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. 

Updated: Dec 5, 2021, 06:52 PM IST
मलायका अरोराचा विकी आणि कतरिनाच्या लग्नाशी काय आहे संबध?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. मात्र, विकी आणि कॅटकडून अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र राजस्थान प्रशासन आणि काही सेलिब्रिटींनी याला दुजोरा दिला आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला विकी आणि कॅटशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफने त्यांच्या लग्नासाठी 700 वर्षे जुना बरवारा किल्ला बुक केला आहे. त्याचबरोबर सवाई माधोपूर येथे असलेल्या या किल्ल्याचं रूपांतर आता आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. विकी आणि कॅट या हॉटेलमध्ये सात फेरे घेणार आहेत.

हे हॉटेल ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत मलायका अरोरा त्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी पोहोचली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बरवारा किल्ल्यात 48 खोल्या आहेत. ज्यांचं एका दिवसाचं भाडं 50 हजार ते 7 लाखांपर्यंत आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफसाठी स्वतंत्र सुईट बुक करण्यात आल्याचंही बोललं जात आहे. यामध्ये एका सुइटचं एका दिवसाचे भाडं 7 लाख असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, 7 डिसेंबरपासून विकी आणि कॅटचा विवाहसोहळा सुरू होणार आहे. 9 डिसेंबरला हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.